Maruti च्या 9 हजारहून अधिक गाड्यांमध्ये सीट बेल्ट बिघाड; हे 5 मॉडेल्स मागवले परत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:27 PM2022-12-06T15:27:15+5:302022-12-06T15:27:33+5:30

वाहन मालकांना कंपनीच्या वर्कशॉपकडून कळविले जात आहे...

maruti suzuki recalled over 9000 units of ciaz Brezza, Ertiga, XL6 and Grand Vitara | Maruti च्या 9 हजारहून अधिक गाड्यांमध्ये सीट बेल्ट बिघाड; हे 5 मॉडेल्स मागवले परत!

Maruti च्या 9 हजारहून अधिक गाड्यांमध्ये सीट बेल्ट बिघाड; हे 5 मॉडेल्स मागवले परत!

googlenewsNext

देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीकडून ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने 9 हजारांहून अधिक वाहने परत मागवली आहेत. या वाहनांत सीट बेल्टशी संबंधित कमतरता आढळून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीने 9125 वाहने परत मागवली आहेत. कंपनीने Ciaz, Ertiga सह एकूण 5 मॉडेल्सची वाहने परत मागविली आहेत. गेल्या 2 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान तयार करण्यात आलेल्याकार परत मागवली जातील.  Front Row सीट बेल्टमध्ये खराबी जाणवल्याने या गाड्या परत मागवल्या जात आहेत.

ही 5 मॉडेल्स परत मागवली जाणार - 
जी 5 मॉडेल्स परत मागवली जाणार आहेत, त्यांत सियाझ, ब्रेझा, एर्टिगा, एक्सएल6 और ग्रैंड विटारा शामिल हैं. मारुति सुजुकी इंडिया ने कहा कि वह अपने मॉडल सियाज, ब्रेजा, एर्टिगा, एक्सएल 6 आणि ग्रँड विटाराच्या 9,125 युनिट्सचा समावेश आहे. यांच्या फ्रंट रो सीट बेल्टच्या एका भागातील संभाव्य तृती दुरुस्त केली जाईल.

कंपनीने म्हटले आहे, की "कारच्या पुढील रोमध्ये सीट बेल्टच्या शोल्डर हाइट अॅडजस्टमेन्ट असेम्बलीच्या भागात खराबी असल्याचा अंदाज आहे. यामुळे क्वचित प्रसंगी, सीट बेल्ट ओपनही होऊ शकतो. तसेच, कंपनीने तपासणीसाठी वाहने परत बोलावणे आणि खराब भाग मोफत बदलन्याचा निर्णय करण्यात आला आहे. वाहन मालकांना कंपनीच्या वर्कशॉपकडून कळविले जात आहे."

Web Title: maruti suzuki recalled over 9000 units of ciaz Brezza, Ertiga, XL6 and Grand Vitara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.