New WagonR: मारुती WagonR चा नवा CNG अवतार लवकरच लाँच, मायलेज जाणून व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 04:37 PM2022-03-12T16:37:35+5:302022-03-12T16:39:06+5:30

ग्राहक ही कार विकत न घेता 12,000 रुपये प्रति महिन्या प्रमाणे भाड्यानेही घरी आणू शकतात. आता कंपनी लवकरच या स्वस्त हॅचबॅकचे सीएनजी व्हेरिअंट बाजारात आणणार आहे.

Maruti Suzuki wagonr CNG 2022 to launch soon in India know the mileage | New WagonR: मारुती WagonR चा नवा CNG अवतार लवकरच लाँच, मायलेज जाणून व्हाल अवाक

New WagonR: मारुती WagonR चा नवा CNG अवतार लवकरच लाँच, मायलेज जाणून व्हाल अवाक

Next

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने प्रदीर्घ प्रतीक्षा करवल्यानंतर अखेर 2022 वॅगनआर भारतात लाँच केली आहे आणि फेसलिफ्ट मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेलसाठी ही किंमत 7.10 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने या कारचे सीएनजी व्हेरिअंटदेखील लाँच केले आहे, या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6.81 लाख रुपये आहे. 

ही किफायतशीर कार केवळ खरेदी करूनच घरी नेता येते, असे नाही तर, ही कार आपण भाड्यानेही घेऊ शकता. कंपनीने नवी WagonR Facelift सबस्क्रिप्शनवरही उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक ही कार विकत न घेता 12,000 रुपये प्रति महिन्या प्रमाणे भाड्यानेही घरी आणू शकतात. आता कंपनी लवकरच या स्वस्त हॅचबॅकचे सीएनजी व्हेरिअंट बाजारात आणणार आहे.

पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्यायांत उपलब्ध -
वॅगनआर 2022 ही पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यांपैकी पहिले इंजिन 1.0-लीटरचे सीरीज डुअल-जेट इंजिन आहे. हे इंजिन 65.7 बीएचपी पर्यंतची दमदार ताकद आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तर हिचे CNG व्हेरिअंट इंजिन 56 बीएचपी ताकद आणि 82 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दुसऱ्या क्रमांकावर येते 1.2-लीटर डुअल व्हीव्हीटी इंजिन, हे 88.5 बीएचपी ताकद आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. 

कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स - 
या कारमध्ये अनेक प्रकारचे अॅडव्हाँस्ड फीचरही देण्यात आले आहेत. यात स्मार्टफोन नेव्हिगेशनसह 7 इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. याला 4 स्पिकर्स आहेत. याशिवाय, या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम आणि रिअर पार्किंग सेन्सर्ससह अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

जबरदस्त मायलेजचा दावा -
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारचे 1.0L इंजिन पेट्रोल व्हर्जनमध्ये 25.19 किमी/प्रति लीटर एवढे मायलेज देईल, जुन्या मॉडेलच्या तुलनेत हे सुमारे 16 टक्के अधिक आहे. तर, S-CNG मध्ये हे मायलेज 34.05 kmpl असेल, सध्याच्या मॉडेलपेक्षा हे 5 टक्के अधिक आहे.

Web Title: Maruti Suzuki wagonr CNG 2022 to launch soon in India know the mileage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.