तयार राहा! मारुती घेऊन येतेय नवी वॅगनआर, पेट्रोल-CNG पेक्षाही कमी खर्चात चालणार; अशी आहे खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 06:20 PM2024-02-02T18:20:05+5:302024-02-02T18:20:24+5:30
वॅगनआर FF व्हेरिअंट 2025 पर्यंत विक्रीसाठी बाजारात येईल, अशी आशा आहे.
मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) कंपनीची बेस्ट सेलिंग कार WagonR च्या फ्लेक्स फ्यूल मॉडेलचे अनावरण केले आहे. मारुती सुझुकीने 2024 भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये हिचे अनावरण केले आहे. दिल्ली 2023 ऑटो एक्सपोमध्ये वॅगनआर फ्लेक्स फ्यूल दिसून आली होती. ही पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत रस्त्यांवर धावताना दिसेल. हे देशातील पहिली मास-मार्केट फ्लेक्स-फ्यूल कार असेल.
इथेनॉल-पेट्रोल मिक्स फ्यूलवर चालणार -
इथेनॉल-पेट्रोल मिक्स इंधनासाठी मारुती वॅगनआरची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. हिच्या इंजिन पॉवरट्रेनसंदर्भात बोलायचे झाल्यास हिला 1.2-लीटरचे नॉर्मल एस्पिरेटेड चार-सिलिंडर इंजिन बघायला मिळेल. जे 88.5bhp ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करेल. हे मानकाच्या रुपात पाच-स्पीड मॅन्युअलसह उपलब्ध असेल. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे, या वॅगनआर मुळे पर्यावरणाचे फार नुकसान होणार नाही.
फ्लेक्स-फ्यूल कार -
वॅगनआर FF व्हेरिअंट 2025 पर्यंत विक्रीसाठी बाजारात येईल, अशी आशा आहे. हिची किंमत मानक व्हेरिअंटच्या तुलनेत काही प्रमाणात अधिक असू शकते. ही भारतातील पहिली मास-मार्केट फ्लेक्स-फ्यूल कार बनू शकते.