Baleno, ऑल्टो नाही! या स्वस्तातल्या कारचा वर्षभर दिसला 'जलवा'; खरेदीसाठी उडाली ग्राहकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 08:32 PM2023-01-10T20:32:30+5:302023-01-10T20:33:43+5:30

सध्या भारतीय बाजारात हिची किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.20 लाख रुपयांपर्यंत जाते.

maruti suzuki wagonr remains best selling car in 2022 Crowds of customers rushed to buy | Baleno, ऑल्टो नाही! या स्वस्तातल्या कारचा वर्षभर दिसला 'जलवा'; खरेदीसाठी उडाली ग्राहकांची झुंबड

Baleno, ऑल्टो नाही! या स्वस्तातल्या कारचा वर्षभर दिसला 'जलवा'; खरेदीसाठी उडाली ग्राहकांची झुंबड

googlenewsNext

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने 2022 मध्ये काही नवे प्रोडक्ट लॉन्च केले आहेत. तर काही जुन्या कार नव्या अवतारात सादर केल्या आहेत. कंपनीने मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या रुपात पहिल्यांदाच एक मिड साईज एसयूव्ही लॉन्च केली आहे. तर बलेनो आणि ब्रेझा सारख्या गाड्यांना अपडेटेड व्हर्जनमध्ये सादर केले आहे. मात्र विक्रीचा विचार करता, मारुतीच्या एका स्वस्तातल्या कारने इतर सर्व गाड्यांना मागे टाकत, पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, ही स्वस्तातली कार गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे. 2022 मध्येही हिचे तब्बल दोन लाखहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत.

आम्ही ज्या कारसंदर्भात बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे  मारुती सुझुकी वॅगनआर. फेब्रुवारी 2022 मध्ये या गाडीत सामान्य अपडेट करण्यात आले होते. सध्या भारतीय बाजारात हिची किंमत 5.47 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.20 लाख रुपयांपर्यंत जाते. 2022 मध्ये मारुती सुझुकी वॅगनआरच्या 2,21,850 युनिट्सची विक्री झाली आहे. तसेच, आकड्यांसह ही 2022 मधील बेस्ट सेलिंग कार ठरली.

34Kmpl पर्यंत मायलेज -
या कारला 1-लिटर युनिट (67PS आणि 89Nm) आणि 1.2-लिटर युनिट (90PS आणि 113Nm), असे दोन इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. हे दोन्ही इंजिन 5 स्पीड मॅन्युअल अथवा ऑटोमॅटिक ट्रांसमिशनला जोडले दातात. यात सीएनजी किटही देण्यात आली आहे.

1-लिटर पेट्रोल एमटी : 23.56 किमी/लिटर

1-लिटर पेट्रोल AMT: 24.43 किमी/लिटर

1.2-लिटर पेट्रोल एमटी: 24.35 किमी/लिटर

1.2-लिटर पेट्रोल एएमटी: 25.19 किमी/लिटर
1-लिटर पेट्रोल-CNG: 34.05km/kg

फीचर्स -
मारुती वॅगनआरच्या फीचर्स लिस्टमध्ये 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, चार-स्पीकर म्युझिक सिस्टिम, स्टिअरिंग-माउंटेड ऑडियो आणि फोन कंट्रोल, आणि 14-इंचाचे अलॉय व्हिल देण्यात आले आहेत.
 

Web Title: maruti suzuki wagonr remains best selling car in 2022 Crowds of customers rushed to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.