टाटाने जेवढ्या EV कार विकल्या नाहीत, त्याच्या दुप्पट मारुती वर्षाला बनविणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:12 PM2023-07-07T14:12:06+5:302023-07-07T14:15:03+5:30

कारच्या किंमती कमालीच्या वाढल्या आहेत. तर इलेक्ट्रीक कारच्या किंमती जवळपास दुप्पट आहेत. तरीही टाटाच्या कारना मोठी मागणी आहे.

Maruti Suzuki will make 10 lakhs Electric cars in Year, will fight tata, from Haryana's Plant | टाटाने जेवढ्या EV कार विकल्या नाहीत, त्याच्या दुप्पट मारुती वर्षाला बनविणार...

टाटाने जेवढ्या EV कार विकल्या नाहीत, त्याच्या दुप्पट मारुती वर्षाला बनविणार...

googlenewsNext

भारतीय वाहन बाजारात बादशाह असलेली मारुती सुझुकी आता ईलेक्ट्रीक कार बाजारात टाटाला टक्कर देण्याची तयारी करत आहे. वर्षाला १० लाख ईलेक्ट्रीक कार बनविण्याच्या प्रकल्प उभारणीला मारुतीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. मारुतीने अद्याप एकही कार भारतीय बाजारात आणलेली नाहीय. उलट मारुतीने सर्व कार या सीएनजीवर आणण्यावर भर दिला आहे. 

कारच्या किंमती कमालीच्या वाढल्या आहेत. तर इलेक्ट्रीक कारच्या किंमती जवळपास दुप्पट आहेत. तरीही टाटाच्या कारना मोठी मागणी आहे. यामुळे टाटाने ईलेक्ट्रीक कार बाजारात मोठा दबदबा निर्माण केला आहे. टाटाला एकच कार कंपनी टक्कर देऊ शकते. ती म्हणजे मारुती आहे. परंतू मारुतीने एकच कार फक्त दाखविली आहे. ती २०२४ - २०२५ मध्ये लाँच केली जाणार आहे. या कारच्या निर्मितीसाठी मारुती प्रकल्पाची तयारी करत आहे. 

हरियाणातील खरखोडा येथे मारुती सुझुकीच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचे बांधकाम जोरात सुरू आहे. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 2025 पर्यंत 2,50,000 युनिट्स असण्याची शक्यता आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर उत्पादन कारखाना दरवर्षी दहा लाख वाहने बनविण्याची क्षमता असणार आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेचा प्लांट उभारण्यासाठी बोर्डाची मंजुरी मिळाली आहे.

प्रीमियम MPV Invicto लाँच दरम्यान मारुतीचे एमडी हिसाशी ताकेउची यांनी 2031 पर्यंत कंपनीची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. कंपनीने भारतीय ऑटोमोटिव्ह बाजारासाठी नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी तसेच नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. २०३१ पर्यंत मारुती सहा ईलेक्ट्रीक वाहने बाजारात आणणार आहे. 

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV EVX पुढील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येऊ शकते. मारुती EVX ची बॅटरी एका चार्जवर 550 किलोमीटरपर्यंत असेल.

Web Title: Maruti Suzuki will make 10 lakhs Electric cars in Year, will fight tata, from Haryana's Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.