मारुती सुझुकीने सुझुकीसोबतचे उत्पादन काँट्रॅक्ट रद्द केले; सुझुकी मोटर गुजरातवर मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:41 PM2023-08-01T12:41:09+5:302023-08-01T12:43:08+5:30
सुझुकी मोटर गुजरातच मारुती सुझुकीला सर्व उत्पादने पुरविते. परंतू, ती जपानच्या कंपनीच्या मालकीची होती.
मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी मुळ कंपनी सुझुकी मोटर कार्पोरेशनच्या ताब्यात असलेला प्लांटचे संपूर्ण हक्क विकत घेण्याची घोषणा केली आहे. सुझुकी मोटर गुजरातमच्या पूर्ण अधिग्रहणाला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
सुझुकी मोटर गुजरातच मारुती सुझुकीला सर्व उत्पादने पुरविते. परंतू, ती जपानच्या मालकीची होती. मारुती सुझुकी बोर्डाने सोमवारी झालेल्या बैठकीत SMG सोबतचा उत्पादन करार संपुष्टात आणण्यास मान्यता दिली आहे. फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.
कंपनीच्या बोर्डाने भागधारकांच्या मान्यतेसह सर्व कायदेशीर आणि नियामकांच्या अधीन राहत स्टेक घेण्याच्या पर्यायाला मान्यता दिली आहे. ऑटोमोबाईल दिग्गज कंपनीने 31 मार्च 2024 पर्यंत व्यवहार पूर्ण करणे अपेक्षित आहे. एसएमसीला अदा करावयाच्या मोबदल्यासह संपादनाची पद्धत पुढील बोर्डाच्या बैठकीत ठरवली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.
मारुती सुझुकीला 2030-31 पर्यंत त्यांची उत्पादन क्षमता सुमारे 4० लाख कारपर्यंत वाढवावी लागणार आहे. जी आताच्या उत्पादनापेक्षा जवळपास दुप्पट आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी आवश्यकता लक्षात घेता, EV, हायब्रीड, CNG, इथेनॉलवरील कार मारुतीला मोठ्या प्रमाणावर बनवाव्या लागणार आहेत. गुजराच्या या प्लांटची सध्याची उत्पादन क्षमता वार्षिक 7.5 लाख युनिट्स आहे.