मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 12:51 AM2023-01-30T00:51:12+5:302023-01-30T00:52:51+5:30

गेल्या वर्षी स्विफ्ट फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह सादर करण्यात आली होती आणि आता या वर्षात अधिक चांगल्या लूकसह आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह नेक्स्ट जनरेशन स्वीफ्ट लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे.

Maruti Suzuki will soon launch the next-gen Swift with better look and latest features | मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत

मारुती सुझुकी लवकरच आणणार नेक्स्ट जनरेशन Swift, ढासू फीचर्ससह असणार अशी खासियत

googlenewsNext

मारुती सुझुकीच्या चाहत्यांसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच हे वर्षही जबरदस्त राहणार आहे. याच वर्षात ही इंडो-जापनीज कंपनी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्टचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी स्विफ्ट फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह सादर करण्यात आली होती आणि आता या वर्षात अधिक चांगल्या लूकसह आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह नेक्स्ट जनरेशन स्वीफ्ट लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. जर तुम्ही 2023 मारुती सुझुकी स्विफ्टची वाट पाहत असाल, तर आम्ही तुम्हाला हिच्या अपडेटेड मॉडेलसंदर्भात काय खास असू शकते यासंदर्भात सांगत आहोत.

नेक्स्ट जनरेशन स्विफ्टमध्ये नवा प्लॅटफॉर्म! -
माध्यमांतील वृत्तांनुसार, नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट नव्या प्लॅटफॉर्मवर आधारलेली असेल. यात अधिक मजबूत स्टीलचा वापर केला जाईल. यामुळी ही अधिक स्ट्रॉन्ग आणि सुरक्षित होईल.

एक्सटीरिअर आणि इंटीरिअर -
2023 स्विफ्टमधील बऱ्याच कॉस्मेटिक बदलांसोबतच, तिचे इंटीरिअर देखील चांगले ठेवले जाईल. नेक्स्ट जनरेशन स्विफ्टचे फीचर्सदेखील अपडेट केले जातील. तसेच यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसोबतच अधिक मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देखील दिसू शकते.

नेक्स्ट जेनरेशन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये 1.2 लिटरचे नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि माइल्ड हायब्रिड सिस्टिम असलेले 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. याशिवाय या हॅचबॅक कारचे मायलेज वाढविण्यावरही भर दिला जाऊ शकतो.

Web Title: Maruti Suzuki will soon launch the next-gen Swift with better look and latest features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.