Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:40 PM2021-08-25T17:40:06+5:302021-08-25T17:42:35+5:30
Maruti Suzuki Electric Vehicle India : कंपनी सध्या हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेईकलवर काम करत आहे. कंपनी टोयोटाच्या सहकार्यानं तयार करतेय कार.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (HEV) वर काम करत आहे. कंपनी टोयोटाच्या सहकार्यानं या कारवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. असं सांगितले जात आहे की ड्रायव्हिंगच्या वेळी, ही कार रस्त्याच्या कडेला तयार केलेल्या मूलभूत पायाभूत सुविधांमधून वीज पुरवठ्यापासून चार्ज होत राहील.
मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत टाटा मोटर्स आणि महिंद्रा या आपल्या प्रतिस्पर्धींपेक्षा मारूती ही कंपनी मागे आहे. यासाठी आता या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कंपनी आता या हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनासाठी टोयोटासोबत काम करत आहे.
“आम्ही टोयोटासह संयुक्तपणे काही इलेक्ट्रिक वाहनांची चाचणी घेणार आहोत. पुढील महिन्यात या प्रोटोटाईप्सची चाचणी केली जाईल. आम्ही शक्य तितक्या वापरकर्त्यांकडून त्यांच्या वापरावर आधारित तयार पॅटर्नवर काम करण्यासाठी अभिप्राय मिळवण्याची योजना आखत आहोत. जोपर्यंत भारतात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही, तोपर्यंत तुम्हाला सेल्फ चार्जिंग मशीनची आवश्यकता असेल, म्हणून आम्ही हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत आहोत,” अशी माहिती मारुती सुझुकीचे कॉर्पोरेट प्लॅनिंग आणि गव्हर्नमेंट अफेयर्सचे कार्यकारी संचालक राहुल भारती यांनी दिली.
जास्त मायलेज
सेल्फ-चार्जिंग कारमध्ये, इंटर्नल कम्ब्युशन इंजिन (ICE) व्हील रोटेशन व्यतिरिक्त बॅटरीला ऊर्जा प्रदान करते, जे अतिरिक्त उर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. कार बॅटरीवर चालत असल्यानं, अशी वाहनं शुद्ध ICE कार (पेट्रोल-डिझेल) पेक्षा जास्त मायलेज देतात. "पुढील 10-15 वर्षात, हे तंत्रज्ञान खूप मजबूतपणे उदयास येईल आणि एक्सटर्नल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांवर अवलंबून न राहता पुढे जाऊ शकते," भारती म्हणाले.
वॅगन-आरची चाचणी
ज्या ठिकाणी मारूती सुझुकीचा प्रश्न आहे, तर कंपनी २०१८ पासून देशात आपल्या वॅगन आर इलेक्ट्रीकच्या ५० युनिट्सची चाचणी करत आहे. कंपनीकडून या कारच्या ड्राईव्हिंग रेंजबाबही सांगण्यात आलेलं नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये फुल चार्ज झाल्यानंतर ही कार १५० किमीची रेंज देऊ शकेल असं सांगण्यात येत आहे.