Maruti suzuki XL6 : ग्राहकांचं फेव्हरिट मारुती XL6 चं 2022 मॉडेल आणणार वादळ, मिळतील जबरदस्त फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 02:49 PM2022-03-12T14:49:21+5:302022-03-12T15:07:29+5:30
या नव्या मॉडेलसहदेखील ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम आणि स्टिअरिंगवरील कंट्रोल्ससारखे फीचर्स दिले जातील, असा अंदाज आहे.
नवी दिल्ली - मारुती सुझुकी 2022 मध्ये मार्केट जबरदस्त गरम करताना दिसत आहे. मारुतीचे अनेक प्रोडक्ट्स याच वर्षी लाँच केले जात आहेत. यांपैकी एक आहे Maruti Suzuki ची 2022 XL6 Facelift. ही कार लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे.
या SUVचा फोटो नुकताच इंटरनेटवर समोर आला आहे. ही कार डिलरशिप यार्डवर दिसून आली. तसेच हे XL6 चे प्रोडक्शन मॉडेल दिसत आहे. स्पाय फोटोजनुसार, या नव्या MPV ला नव्या दोन रंगांचे मल्टी स्पोक अलॉय व्हील्स देण्यात येतील. तसेच, सध्याच्या मॉडलपेक्षा नवे मॉडेल साइजने काही प्रमाणात मोठे असेल, असा अंदाज लावला जात आहे.
समोरील ग्रिलमध्ये बदल -
मारुती सुझुकीने सध्याच्या XL6 सोबत 15-इंचांचे ब्लॅक कलर्ड अलॉय व्हील्स दिले आहेत. हे व्हील्स हिच्या साइजच्या तुलनेत काही प्रमाणात छोटे दिसतात आणि ग्राहकांनी यासंदर्भात कंपनीला फीडबॅकही दिला होता. यामुळे नवे मॉडल मोठे अलॉय व्हील्ससह येऊ शकते. याशिवाय, नव्या XL6 सह बदललेले समोरील ग्रिल, नवे फीचर्स आणि नवे अपहोल्स्ट्री दिले जाऊ शकते. हे कार कंपनीचे सर्वात महागडे मॉडेल आहे. यात एलईडी हेडलॅम्प्स, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, मधल्या जागेत कॅप्टन सीट्ससह वन टच रिक्लाइन फंक्शन देण्यात आले आहेत.
सध्याच्या मॉडेलचे 1.5-लीटर इंजिन -
या नव्या मॉडेलसहदेखील ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम आणि स्टिअरिंगवरील कंट्रोल्ससारखे फीचर्स दिले जातील, असा अंदाज आहे. कंपनी 2022 XL6 मध्ये सध्याच्या मॉडेल प्रमाणेच 1.5-लीटर पेट्रोल माइल्ड-हायब्रिड इंजिन देऊ शकते. हे इंजिन 103 बीएचपी एवढी पॉवर आणि 138 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच कंपनीने या जिंजिनला 5-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. लाँच झाल्यानंतर, या कारचा सामना महिंद्रा मराजो आणि नुकत्याच लाँच झालेल्या Kia Carens MPV सोबत असेल.