Maruti Suzuki चा मोठा प्लॅन, ५.५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीतून उत्पादन करणार दुप्पट; पाहा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 02:27 PM2023-05-12T14:27:39+5:302023-05-12T14:28:09+5:30

कंपनी आपलं बाजारपेठेतील हिस्सा अधिक वाढवण्यावर काम करत आहे.

Maruti Suzuki's big plan is to double production with an investment of $5.5 billion | Maruti Suzuki चा मोठा प्लॅन, ५.५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीतून उत्पादन करणार दुप्पट; पाहा प्लॅन

Maruti Suzuki चा मोठा प्लॅन, ५.५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीतून उत्पादन करणार दुप्पट; पाहा प्लॅन

googlenewsNext

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती-सुझुकी आपलं उत्पादन दुप्पट करण्याच्या योजनेवर काम करत आहे. 2030 पर्यंत उत्पादन क्षमता 4 मिलियन वाहनांपर्यंत दुप्पट करण्यासाठी कंपनी देशात 5.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. स्थानिक बाजारपेठ आणि निर्यातीत आपला हिस्सा वाढवण्याच्या उद्देशानं कंपनी आपलं उत्पादन दुप्पट करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मारुती सुझुकी दोन नवीन उत्पादन प्रकल्पांमध्ये 2,50,000 युनिट्सच्या क्षमतेसह 8 असेंब्ली लाइन सुरू करणार आहे.

पहिल्या युनिटचं काम सुरू

युनिट सुरू होण्याच्या आणि वेळेनुसार हा खर्च वाढूही शकतो. हरयाणातील खरखोडा येथे पहिल्या युनिटच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. मारुती सुझुकीची सध्या गुजरातमधील महेसाणा आणि गुरुग्राममधील मानेसर येथे एकूण दोन दशलक्ष युनिट्सची क्षमता आहे.

10 लाख एक्सपोर्ट

कंपनीला खरखौदा प्लांटमध्ये एक मिलियन युनिटपर्यंत क्षमतेची मंजुरी मिळाली आहे. कंपनीला नव्या साईटवर दहा लाख युनिट्ससाठी तत्वत: मंजुरी मिळाली आहे. एकूण 40 लाख युनिटच्या प्रोडक्शन प्लानमध्ये 10 लाख एक्सपोर्ट आणि ओईएमच्या विक्रीतून होतील अशी माहिती यापूर्वी कंपनीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी एका मुलाखतीत दिली.

बाजारातील हिस्सा वाढवण्यावर भर 

उर्वरित कॅपॅसिटीचा वापर कंपनी भारतीय बाजारपेठेत आपला हिस्सा वाढवण्यावर करणार आहे. यामुळे मारुती सुझुकी 2022-23 मध्ये 50 टक्के बाजार हिस्स्यापर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल. आमचं ध्येयं पुन्हा एकदा 50 टक्के बाजार हिस्सा गाठण्याचं असल्याचं आरसी भार्गव यांनी सांगितलं.

Web Title: Maruti Suzuki's big plan is to double production with an investment of $5.5 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.