Maruti Swift: मारुतीच्या या स्वस्त हॅचबॅकवर ग्राहकांच्या उड्या; 25 लाख कारची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:55 PM2021-09-14T14:55:12+5:302021-09-14T14:55:37+5:30

Maruti Swift Sale in 16 years: मारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत.

Maruti Swift Sales crosses 25 lakhs Marks in last 16 years; huge demand by youth | Maruti Swift: मारुतीच्या या स्वस्त हॅचबॅकवर ग्राहकांच्या उड्या; 25 लाख कारची विक्री

Maruti Swift: मारुतीच्या या स्वस्त हॅचबॅकवर ग्राहकांच्या उड्या; 25 लाख कारची विक्री

googlenewsNext

मारुतीच्या सर्वात स्वस्त हॅचबॅकने विक्रीचा नवीन रेकॉर्ड केला आहे. 25 लाख युनिट विकले गेले असून ही कार 2005 मध्ये लाँच झाली होती. या 16 वर्षांत या कारचे रुपडेच पालटले असून ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. 

Maruti Suzuki: मारुतीचा ग्राहकांना झटका; Swift सह CNG कारच्या किंमती वाढविल्या, जाणून घ्या...

मारुती सुझुकीची स्विफ्ट कार आपल्या अॅडव्हान्स स्टायलिंग, पावरट्रेन आणि आरामदायी ड्रायव्हिंगमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. स्विफ्टची किंमत 5.84 लाख रुपये ते  8.52 लाख रुपये आहे. या कारचे सीएनजी व्हेरिअंटही येणार आहे. सध्या या कारची 9 व्हेरिअंट उपलब्ध आहेत. आता ही कार फक्त पेट्रोलमध्येच उपलब्ध असून 1.2 लीटर ड्युअलजेट इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनाला स्टार्ट-स्टॉप फंक्शन देण्यात आले आहे. यामुळे कार थांबविल्यास एका ठराविक काळासाठी इंजिन बंद होते आणि इंधन वाचते. ही कार मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये 23.20kmpl चे ARAI मायलेज आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये 23.7kmpl चे मायलेज देते. 

Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत

मारुती सुझुकीचे भारतातील कार्यकारी संचालक (विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, स्विफ्ट 2020-2021 मध्ये भारतातील सर्वाधिक खपाची कार होती. तिन्ही पिढ्यांनी ICOTY पुरस्कार जिंकला आहे. स्विफ्ट घेणारे 52% हून अधिक ग्राहक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यामुळे या कारला तरुण पीढीची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसते.

OMG! मारुती सुझुकी तगडी कार CNG मध्ये आणणार; Brezza चे डिटेल्स लीक

मारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत. यापैकी काही कार सीएनजीमध्ये आहेत. आता आणखी दोन कारची त्यामध्ये भर पडणार आहे. 

Maruti Suzuki Swift CNG मध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire CNG) देखील सीएनजीमध्ये लाँच केली जाणार आहे. दोन्ही कार टेस्टिंगवेळी दिसल्या आहेत. या दोन्ही गाड्या सीएनजीमध्ये लाँच झाल्यावर मारुतीकडे एकूण 8 सीएनजी कार असणार आहेत. एक अर्टिगा सोडली तर अन्य गाड्या या 30 ते 32 किमी प्रति किलोचे मायलेज देतात. 

Web Title: Maruti Swift Sales crosses 25 lakhs Marks in last 16 years; huge demand by youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.