Maruti-Tata बघतच राहिले! या 6 लाख रुपयांच्या कारची ग्राहकांना भुरळ, कंपनीच्या विक्रीत 1486% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 04:47 PM2022-12-15T16:47:55+5:302022-12-15T16:49:00+5:30

महत्वाचे म्हणजे, या स्वस्त कारच्या माध्यमाने सिट्रॉनने थेट टाटा आणि मारुतीलाच टक्कर दिली आहे.

Maruti-Tata kept watching Temptation in the Customer about this Rs 6 lakh car know about the citroen car sales in november 2022 | Maruti-Tata बघतच राहिले! या 6 लाख रुपयांच्या कारची ग्राहकांना भुरळ, कंपनीच्या विक्रीत 1486% वाढ

Maruti-Tata बघतच राहिले! या 6 लाख रुपयांच्या कारची ग्राहकांना भुरळ, कंपनीच्या विक्रीत 1486% वाढ

googlenewsNext

कार कंपन्यांसाठी नोव्हेंबर महिना जबरदस्त ठरला आहे. या महिन्यात कंपन्यांच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाल्याचे दिसून आले. मारुती सुझुकीपासून ते Hyundai, टाटा मोटर्स, स्कोडा आणि एमजी मोटर इंडिया सारख्या कंपन्यांच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. मारुती सुझुकीने 20.7%, Hyundai ने 29.7% आणि Kia Motors ने 69.0% टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तसेच, वार्षिक आधारावर Skoda ची बिक्री 101.9% वाढली आहे. मात्र, एका कंपनीने या सर्वच कंपन्यांना मागे टाकत आपल्या विक्रीत तब्बल 1486 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

या कंपनीने सर्वच कंपन्यांना टाकले मागे - 
आपण ज्या कंपनीसंदर्भात बोलत आहोत त्या कंपनीचे नाव आहे सिट्रॉन. फ्रन्सची कार निर्माता कंपनी Citroen ही भारतात एन्ट्री करणाऱ्या नव्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सध्या भारतीय बाजारपेठ समजून घेत आहे. भारतामध्ये Citroen केवळ Citroën C5 Aircross आणि Citroen C3. या दोनच कारची विक्री करत आहे. पण या दोनच कारच्या बळावर कंनीने अभूतपूर्व वाढ नोंदविली आहे.

एका कारने केली कमाल - 
या कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण 825 कार विकल्या आहेत. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये केवळ 52 कार विकल्या होत्या. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत आता, कंपनीच्या विक्रीत तब्बल 1486.5% टक्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या या विक्रीत सर्वात मोठा वाटा आहे, Citroen C3 चा. नोव्हेंबर महिन्यात C3 हॅचबॅकच्या 804 युनिट्सची विक्री झाली. तर ऑक्टोबरमध्ये 1180 युनिट्स, सप्टेंबरमध्ये 1354 युनिट्स आणि ऑगस्टमध्ये 825 युनिट्सची विक्री झाली होती.

महत्वाचे म्हणजे, या स्वस्त कारच्या माध्यमाने सिट्रॉनने थेट टाटा आणि मारुतीलाच टक्कर दिली आहे. हिची किंमत 5.88 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.15 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारचा सामना थेट Maruti Wagon R, Celerio, Tata Punch आणि Tata Tiago सारख्या कारसोबत असतो.

Web Title: Maruti-Tata kept watching Temptation in the Customer about this Rs 6 lakh car know about the citroen car sales in november 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.