Maruti, Tata असो अथवा Mahindra…; भारतात कुणीही विको इलेक्ट्रिक कार, पैसा छापणार फक्त चीन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:09 IST2024-12-19T20:08:27+5:302024-12-19T20:09:12+5:30
Tata, Mahindra आणि Maruti शिवाय, देशात इव्ही विकण्याच्या बाबतीत MG Motor India आणि BYD India या कंपन्यांचाच टॉप-5 EV कंपन्यांमध्ये समावेश होतो...

Maruti, Tata असो अथवा Mahindra…; भारतात कुणीही विको इलेक्ट्रिक कार, पैसा छापणार फक्त चीन!
भारतात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये सध्या टाटा मोटर्स आघाडीवर आहे. मात्र या बाबतीत आता महिंद्रा अँड महिंद्राही लवकरच मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, मारुती सुझुकीनेही या सेगमेंटमध्ये तगडी टक्कर देण्याचा प्लॅन आखला आहे. पण, या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे, भारतात इलेक्ट्रिक कार कुणीही विकली तरी छप्परफार कमाई चीनची होणार आहे, पैसा मात्र चीन छापणार आहे, मालामाल चीन होणार आहे.
Tata, Mahindra आणि Maruti शिवाय, देशात इव्ही विकण्याच्या बाबतीत MG Motor India आणि BYD India या कंपन्यांचाच टॉप-5 EV कंपन्यांमध्ये समावेश होतो. पण या दोन्ही कंपन्या चीनच्या आहेत. यामुळे अशा परिस्थितीत टाटा, महिंद्रा आणि मारुतीच्या इलेक्ट्रिक कारचे चीनशी काय कनेक्शन? जाणून घेऊयात...
इलेक्ट्रिक कारचं चीनशी कनेक्शन -
कोणत्याही इलेक्ट्रिक कारच्या एकूण किमतीपैकी सुमारे एक तृतीयांश खर्च हा बॅटरीवर होतो. इव्ही कारचा बॅटरी पॅक हाच तिची खरी ताकद असते. याशिवाय कार केवळ एक डब्बा आहे. टाटा मोटर्स सध्या वेगवेगळ्या उत्पादकांकडून आपल्या वाहनांसाठी बॅटरी मागवते. महत्वाचे म्हणजे, टाटा मोटर्स स्वतःच बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचे प्लॅनिंग करत आहे.
टाटा मोटर्स आपल्या Curvv EV साठी चिनी कंपनी ऑक्टिलियन पॉवर सिस्टिम्सकडून बॅटरी पॅक सोर्स करत आहे. विशेष म्हणजे, या बॅटरीमध्ये असलेले सेल्सदेखील चिनी कंपनी EVE च तयार करते. याशिवाय टाटा मोटर्स चीनच्या लिथियम आयन सेल उत्पादक कंपनी Gotion कडूनही बॅटरी सेल्स सोर्स करते.
महिंद्रा-मारुतीनं घेतलीय BYD ची मदद -
महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) नुकतेच BE 6 आणि XEV 9e सारख्या बॉर्न इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. या दोन्ही कारने त्यांच्या फिचर्सच्या जोरावर बाजारात दबदबा निर्माण केला आहे. याचप्रमाणे मारुती सुझुकीनेही आपली eVitara शोकेस केली आहे. या दोन्ही कारमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे, BYD च्या ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर. महिंद्रा आणि मारुती यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारसाठी चीनी ऑटोमोबाईल कंपनी BYD कडून ब्लेड बॅटरी पॅकची थेट आयात केले आहे.
ब्लेट बॅटरी टेक्नॉलॉजी एक अनोखी टेक्नॉलॉजी आहे. कारण यात सिलेंडर सेलऐवजी सेल्स लांब ब्लेड्स प्रमाणे डिझाइन केला जातो. यामुळे सेल्स खराब होण्याची शक्यता कमी होते. यामुळे बॅटरीची लाइफ चांगली होते आणि ती फास्ट चार्ज होते.