मारुतीने बघून बघून घेतले! ब्रेझाचे मायलेज 2.5 किमीने वाढविले; सोबत 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅगही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:46 PM2024-01-22T14:46:55+5:302024-01-22T14:47:09+5:30
क्रेटा, सेल्टॉस, नेक्सॉनच्या खेळात मारुती सुझुकीने आपले ट्रम्प कार्ड फेकले आहे. ब्रेझा आधीच्या तुलनेत जास्तीचे मायलेज देणार आहे.
क्रेटा, सेल्टॉस, नेक्सॉनच्या खेळात मारुती सुझुकीने आपले ट्रम्प कार्ड फेकले आहे. लोकप्रिय असलेली मारुती ब्रेझाचे मायलेज वाढविणारे माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञान रिलाँच केले आहे. Maruti Brezza च्या सर्वात वरच्या दोन मॉडेलना माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
यामुळे ब्रेझा आधीच्या तुलनेत जास्तीचे मायलेज देणार आहे. ZXI आणि ZXI + च्या मॅन्युअल व्हेरिअंटमध्येही हा पर्याय देण्यात आला आहे. मारुतीने गेल्या वर्षी जुलैमध्ये माईल्ड हायब्रिडच्या मॅन्युअल व्हेरिअंटला बंद केले होते. यानंतर हे तंत्रज्ञान फक्त ऑटोमॅटीकमध्येच मिळत होते. आता सर्वांनाच हे तंत्रज्ञान मिळणार आहे.
याचसोबत मारुतीने ब्रेझाला थोडे पॉलिश केले आहे. ZXI मॅन्युअल वेरिएंटची किंमत 11.05 लाख रुपये आणि ZXI+ मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 12.48 लाख रुपये एक्स शोरुम ठेवली आहे. सौम्य-हायब्रीड प्रकारामुळे ब्रेझाचे मायलेज 2.51 किलोमीटरने वाढणार आहे. आता या कारचे मायलेज 19.89 kmpl होईल.
मारुती ब्रेझाच्या या नवीन प्रकारात, कंपनीने सर्व आसनांसाठी सीट-बेल्ट रिमाइंडर, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता प्रोग्राम (ESP) आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. कंपनीने 1.5 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे जे 48V सौम्य हायब्रिड सिस्टमसह येते. हे इंजिन 102 BHP पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते.