Maruti WagonR आणि Alto K10 सेफ्टीमध्ये निघाल्या फुस्स, मिळाले 1-2 स्टार! असा आला क्रॅश टेस्ट रिझल्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:31 PM2023-04-04T17:31:32+5:302023-04-04T17:32:56+5:30
ग्लोबल NCAP ने गेल्या 9 वर्षात मारुती सुझुकी इंडियाच्या 14 मॉडेल्सची टेस्टिंग केली आहे. यांपैकी केवळ मारुती ब्रेझालाच समाधानकारक 4 स्टार रेटिंग मिळाली आहे.
मारुती सुझुकीच्या कारची त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नेहमीच खिल्ली उडवली जाते. आता कंपनीच्या मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) आणि मारुती सुझुकी अल्टो के 10 (Maruti Suzuki Alto K10) या लोकप्रिय कारनेही सुरक्षिततेच्या बाबतीत निराश केले आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या दोनही कार फुस्स ठरल्या आहेत. ग्लोबल NCAP ने गेल्या 9 वर्षात मारुती सुझुकी इंडियाच्या 14 मॉडेल्सची टेस्टिंग केली आहे. यांपैकी केवळ मारुती ब्रेझालाच समाधानकारक 4 स्टार रेटिंग मिळाली आहे.
मारुती सुझुकी वॅगनआरला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 1 स्टार, तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 0 स्कोर आला आहे. तर मारुती सुझुकी ऑल्टो K10 ला अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन साठी 2 स्टार, तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 0 स्कोर मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, ऑल्टो के-10 आणि वॅगनआर हे देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहेत.
मारुती सुझुकी ऑल्टो K10 ने समोरील धडकेत वयस्क प्रवाशाच्या छाती पासून ते डोक्यापर्यंत ठीक-ठाक प्रोटेक्शन दिले. मात्र साइडने टक्कर झाल्यानंतर, हिने कमकुवत सुरक्षा दर्शवली आहे. याच पद्धतीने वॅगनआरनेही ड्रायव्हरच्या छातीसाठी कमकुवत सुरक्षिततात दर्शवली आहे.
Maruti Wagonr चे सेफ्टी फीचर्स -
मारुती वॅगनआरची किंमत 5.53 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारला डुअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेंसर आणि हिल-होल्ड असिस्ट (केवळ एएमटी मॉडेलवर) सारखे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिले जातात.
Maruti Alto K10 चे सेफ्टी फीचर्स -
मारुती वॅगनआरची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारला डुअल एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग सारखे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स दिले जातात.