मारुतीकडून WagonR कारचं आणखी एक नवं व्हर्जन लाँन्च, किंमत फक्त ५.३९ लाख!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 08:11 PM2022-04-04T20:11:41+5:302022-04-04T20:12:19+5:30
भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुजुकीनं आपल्या लोकप्रिय WagonR कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारात आणलं आहे.
भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुजुकीनं आपल्या लोकप्रिय WagonR कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारात आणलं आहे. या कारची भारतीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता कंपनीनं नजिकच्या काळात या कारमध्ये नवनवे बदल करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या व्हर्जन कारचं नाव WagonR Tour H3 असं देण्यात आलं आहे. २०२२ सालच्या या लेटेस्ट व्हर्जनची कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नव्या WagonR कारच्या OneGonR Tour E3 मॉडच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत ५.३९ लाख इतकी असणार आहे. तर सीएनजी व्हेरिअंटची किंमत ८.३४ लाख इतकी असणार आहे. दोन्ही कारच्या किमती दिल्लीतील एक्स-शोरुम किमती आहेत. नव्या २०२२ मारुती सुजुकी वॅगन-आर टूअर ई-३ कारमध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच कारचे सस्पेन्शनमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवी WagonR कार १.०३ लीटर, तीन सिलिंडर, K10C पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असणार आहे. जी ५,५०० आरपीएमवर ६४ बीएचपी आणि ३,५०० आरपीएमवर ६९ एनएम टॉर्ग जनरेट करण्याची क्षमता ठेवणारी आहे. कारचं सीएनजी व्हर्जन देखील पावरफुल देण्यात आलं आहे.
WagonR Tour H3 चे स्पेसिफिकेशन्स
WagonR Tour H3 च्या पेट्रोल मॉडलची फ्युअल कॅपेसिटी २५.४० Kmpl इतकी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार कारच्या सीएनजी मॉडल एआरएआय सर्टिफाइड ३४.६३ किमी मायलेज देऊ शकते. २०२२ मारुती वॅगन-आर टूअर एटची भारतात दोन रंगात उपलब्ध करन देण्यात आली आहे. यात सुपिरिअर व्हाइट आणि सिल्की सिल्वर रंगांचा समावेश आहे.
नव्या WagonR मध्ये बॉडी कलर बंपर, व्हील सेंटर कॅप आणि ब्लॅक आऊट ORVMs देण्यात आले आहेत. तसेच हँडल आणि ग्रिलचाही यात समावेश आहे. कारच्या अंतर्गत भागात ड्युअल-टोन इंटिरिअर देण्यात आलं आहे. तसंच फ्रंट केबिन लँप, ड्रायव्हर साइड सॅनिटायझर आणि एक टिकीट होल्डर देखील देण्यात आलं आहे. कारमध्ये फ्रंट आणि रिअर हेडरेस्ट देखील असणार आहे. नव्या कारमध्ये फ्रंट पावर विंडो आणि साइड ऑटो डाऊन फंक्शन असणार आहे. कारच्या इतर स्पेसिफिकेशनबाबत बोलायचं झालं तर मॅन्युअल एसी, रिअर पार्सल ट्रे, रिल्काइनिंग आणि फ्रंट स्लायडिंग सीट, ड्युअर एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, स्पीड लिमिटिंग फंक्शन, रिअर पार्किंग सेंसर आणि सेंट्रल डोअर लॉकिंग यांचा समावेश आहे.