आता ना Thar टिकणार, ना Innova! दिवाळी पूर्वीच मारुती करणार मोठा धमाका; येतायत 3 नव्या कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 08:23 PM2023-01-25T20:23:23+5:302023-01-25T20:24:28+5:30
आता मारुती सुझुकी पुढील 3 ते 4 महिन्यांत दोन नवे मॉडेल्स लान्च करत आपला SUV पोर्टफोलिओ आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे.
मारुतीच्या नव्या ब्रेझा (Brezza) आणि ग्रँड विटाराला (Grand Vitara) ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे कंपनी खूश आहे. यानंतर आता मारुती सुझुकी पुढील 3 ते 4 महिन्यांत दोन नवे मॉडेल्स लान्च करत आपला SUV पोर्टफोलिओ आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. याच बरोबर, कंपनी ब्रँडचे सर्वात महाग युटिलिटी वाहन 2023 च्या दिवाळीपूर्वीच लॉन्च करू शकते. ही एक 7 सीटर कार असेल.
Maruti Suzuki Fronx -
ही कार 100bhp, 1.0L 3-सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 89bhp, 1.2L डुअल-जेट NA पेट्रोल या दोन इंजिन पर्यांत उपलब्ध होईल. याच बरोबर, 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि AMT हे ट्रान्समिशन पर्यायही यात उपलब्ध असतील. हिचे इंटिरिअर बलेनो आणि नव्या ब्रेझा सारखे असू शकते. नवी मारुती फ्रोंक्स क्रॉसओव्हर सुझुकीच्या HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यावरच बलेनो हॅचबॅकही तयार झाली आहे.
Maruti Suzuki Jimny -
ही एसयूव्ही 1.5-लिटर K15B 4-सिलिंडर पेट्रोल इंजिनसह आणली जाईल. हिचे इंजिन 103bhp आणि 134Nm आऊटपुट देईल. ट्रान्समिशन पर्यांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिट सामील असतील. या कारमध्ये सुझुकीचे AllGrip Pro 4×4 ड्राइव्हट्रेन मिळेल. ही कार दोन ट्रिम्स जीटा आणि अल्फा मध्ये येईल. ही एसयुव्ही बाजारात महिंद्रा थारला टक्कर देईल.
Maruti Suzuki 7-Seater MPV -
माध्यमांतील वृत्तांनुसार, मारुती सुझुकी ऑगस्ट 2023 पर्यंत भारतीय बाजारात टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर बेस्ड 7 सीटर एमपीव्ही सादर करू शकते. जे ब्रँडचे सर्वात महागडे मॉडेल असेल. ही नेक्सा डिलरशिप नेटव्हर्कच्या माध्यमाने विकली जाईल. या कारमध्ये ADAS तंत्रज्ञानही असेल. ही बाजारात इनोव्हा हायक्रॉसला टक्कर देईल.