Maruti Celerio CNG Price, Mileage, Booking: मारुतीची सेलेरिओ सीएनजी येतेय; कधी लाँच होणार? बुकिंग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:06 PM2022-01-13T13:06:32+5:302022-01-13T13:09:16+5:30
Maruti Celerio CNG Price, Mileage, Booking: या महिन्य़ात टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीदेखील सिलेरिओचे सीएनजी मॉडेल लाँच करत आहे.
देशाची सर्वाधिक मायलेजवाली कार मारुतीने गेल्या महिन्यात लाँच केली. नवा लुक, नवे फिचर्स आदीनी युक्त अशी सेलेरिओची तिसरी पिढी भारतीय रस्त्यांवर धावू लागलेली असताना आता तिचे सीएनजी व्हेरिअंट येत आहे. जानेवारीतच सीएनजी व्हेरिअंट लाँच होण्याची शक्यता असून डीलरकडे बुकिंगही सुरु झाले आहे.
या महिन्य़ात टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीदेखील सिलेरिओचे सीएनजी मॉडेल लाँच करत आहे. मारुतीने गेल्या वर्षभरात तेरा लाख कार विकल्या आहेत.
काही निवडक डीलरशीपमध्ये ११००० रुपये देऊन New Maruti Celerio CNG बुक करू शकणार आहात. अद्याप कंपनीने लाँचिंग डेट आणि बुकिंगची माहिती दिलेली नाही. डीलरला काही हिंट मिळाल्या की ते बुकिंग सुरु करतात. Celerio VXi AMT व्हेरिअंटचे एआरएआय मायलेज पेट्रोलमध्ये 26.68kmpl आहे. हे देशातील एखाद्या कारचे सर्वाधिक मायलेज आहे. यामुळे सीएनजी कारचे मायलेजही चांगले मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
संभाव्य किंमत...
मारुती सेलेरिओ सीएनजीची किंमत ६ लाख रुपयांहून अधिक ठेवली जाण्याची शक्यता आहे. सध्या याच्या पेट्रोल पॉवर्ड व्हेरिअंटची किंमत 4.99 लाख रुपये ते 6.94 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.
इंजिन ताकद निराश करणारे...
सेलेरिओ सीएनजीमध्ये मोठे घाट असतील तर काहीशी मार खाते. या कारमद्ये १.० लीटरचे ३ सिलिंडर इंजिन असेल. पेट्रोलचे इंजिन 66bhp ताकद आणि 89Nm टॉर्क देते. यामुळे सीएनजी मॉडेल यापेक्षा कमी ताकद निर्माण करणार आहे.