मारुतीची सीएनजी कार पार्किंगमध्येच पेटली; शेजारील कारलाही बसली झळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 14:50 IST2020-02-17T14:49:07+5:302020-02-17T14:50:00+5:30
पनवेल आरटीओ कार्यालया समोरच गाडी पार्किंगसाठी स्टील मार्केट कडून जागा देण्यात आली आहे.

मारुतीची सीएनजी कार पार्किंगमध्येच पेटली; शेजारील कारलाही बसली झळ
कळंबोली : सोमवारी साडे बाराच्या सुमारास पनवेल आरटीओ समोरील पार्किंगमध्ये उभी असलेल्या सेलेरिओ कार जळून खाक झाली. वेळीच अग्निशमन दलाने घटनास्थळी येवून आग विझविली. मात्र, तोपर्यंत या आगीची झळ शेजारी उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ कारला बसली.
पनवेल आरटीओ कार्यालया समोरच गाडी पार्किंगसाठी स्टील मार्केट कडून जागा देण्यात आली आहे. दररोज पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरटीओ कार्यालयात आपल्या वाहनांची कामे करण्यासाठी येतात. तेव्हा या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली जाते.
Video: पेट्रोल पंपावर कारचा दरवाजा कधीच उघडू नका; वाचा कारण
सोमवारी साडेबाराच्या सुमारास सीएनजी गॅस फिटिंग असलेली सेलेरिओ या गाडीला आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीमुळे बाजूला स्कॉर्पिओ गाडी सुध्दा अर्धवट जळाली आहे. वेळीच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेवून आग विझविली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. लागलेल्या आगीमुळे इतर गाड्या आगीच्या भक्षस्थानी जाण्यापासून वाचल्या आहेत. आरटीओ ने सुध्दा जमा केलेल्या गाड्या याच पार्किंगमध्ये ठेवल्या आहेत.