काळ्या वेस्टनात लपविली, पण चार्जिंग करताना सापडली; मारुतीच्या पहिल्या EV कारची झलक दिसली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 11:42 AM2023-06-25T11:42:00+5:302023-06-25T11:43:57+5:30
जेव्हा मारुतीची पहिली कार येईल तेव्हा भारतात टाटाची हिस्सेदारी २५ टक्क्यांपर्यंत गेलेली असेल.
ईलेक्ट्रीक कारच्य़ा क्षेत्रात टाटाने मुसंडी मारली आहे. परंतू, मारुती सुझुकी दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नाहीय. जेव्हा मारुतीची पहिली कार येईल तेव्हा भारतात टाटाची हिस्सेदारी २५ टक्क्यांपर्यंत गेलेली असेल. असे असताना मारुतीने ईलेक्ट्रीक कारच्या आगमनाची तयारी सुरु केली आहे. इंडे जपानी कंपनीची पहिली इलेक्ट्रीक कार ईवीएक्सची टेस्टिंग सुरु झाली आहे.
या टेस्टिंग कारचे फोटो लीक झाले असून याद्वारे बरेच काही समजले आहे. यामध्ये ग्रँड विटारा आणि फ्राँक्स सारख्या एसयुव्हीचा लुक असणार आहे. मारुती या कारद्वारे टाटा आणि महिंद्राला टक्कर देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मारुतीच्या ईव्हीएक्सला पुढील वर्षी किंवा २०२५ मध्ये भारतात लाँच केले जाऊ शकते. याच्या कॉन्सेप्ट मॉडेलला २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये शोकेस करण्यात आले होते. कंपनीने ईव्हीएक्समध्ये 60 kWh बॅटरी पॅक असेल हे सांगितलेले आहे. तिची रेंज 550 किलोमीटर असणार आहे.
हाय-माउंट रॅपराऊंड टेललाइट्स, विंटेज स्टाइल हेडलाइट्स, मल्टीस्पोक सिल्व्हर अलॉय व्हील आणि कॅमेरा असलेली ORVMs आदी या कारमध्ये असल्याचे दिसत आहे. काळ्या कॅमोमध्ये झाकलेल्या इलेक्ट्रिक SUV ची चाचणी पोलंडमध्ये घेतली जात आहे. टोयोटाच्या मदतीने ही ईलेक्ट्रीक कार विकसित करण्यात आलेली आहे.
भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने आतापर्यंत एकही इलेक्ट्रिक कार लॉन्च केलेली नाही. मारुतीने पेट्रोल आणि सीएनजी कारवर लक्ष केंद्रीत केले आहे. पुढील काळात, EVX सोबत WagonR EV, Franks EV आणि Baleno EV सारखी वाहने लॉन्च केली जाऊ शकतात.