मारुतीची फ्राँक्स आली नाही तोच, टाटा-ह्युंदाई घेरणार; येतायत दोन एसयुव्ही...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 08:17 PM2023-04-28T20:17:35+5:302023-04-28T20:38:37+5:30
भारतीय बाजारपेठेत मायक्रो एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुतीला टक्कर मिळणार आहे.
Maruti Suzuki Fronx Rival New SUV: भारतीय बाजारपेठेत मायक्रो एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकापेक्षा जास्त नवीन वाहने आली आहेत. त्यांच्यामध्ये या सेगमेंटमध्ये तीव्र स्पर्धा आहे. अलीकडेच मारुती सुझुकीने टाटा पंचशी स्पर्धा करण्यासाठी नवीन SUV Maruti Suzuki Fronx लाँच केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये आहे, तर सर्वात टॉप मॉडेल हे 13.13 लाख रुपयापर्यंत आहे. परंतू स्थिरस्थावर होणार नाही तोच फ्राँक्सला टक्कर देण्यासाठी Hyundai ची नवीन SUV Exter आणि sub-4 मीटर SUV Tata Nexon चे अपडेटेड मॉडेल्स लॉन्च केले जातील.
Hyundai Exter Launch Details: दक्षिण कोरियन ऑटोमेकर Hyundai ने अलीकडेच त्यांच्या सर्वात लहान SUV Xeter ची पहिली झलक दाखवली. यामध्ये पॅरामेट्रिक डायनॅमिझम डिझाइन दिसणार आहे. या SUV मध्ये पॅरामेट्रिक फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर लॅम्प्स, स्क्वेअर शेप हेडलॅम्प्स, H आकाराचे LED DRL आणि स्पोर्टी फ्रंट बंपर यासह बरेच खास एक्सटीरियर फिचर दिसतील. Hyundai Xtor 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह ऑफर केली जाऊ शकते आणि मॅन्युअल व ऑटो गिअरबॉक्ससही मिळतील. दुसरीकडे, वैशिष्ट्यांच्या बाबतीत, एक्सटरला Apple कार प्ले आणि Android ऑटो सपोर्टसह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि सनरूफसह अनेक वैशिष्ट्ये मिळतील. Hyundai Xtor पुढील महिन्यात लाँच केली जाऊ शकते.
Tata Nexon Facelift Launch Details: टाटा मोटर्स आपली सर्वाधिक विकली जाणारी SUV Nexon अपडेट करणार आहे, ज्यामध्ये नवीन पेट्रोल इंजिनसह बरेच कॉस्मेटिक बदल आणि अपग्रेड केलेली वैशिष्ट्ये दिसतील. टाटाच्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये नवीन 1.2 लीटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिसू शकते, जे 125 पीएस पॉवर आणि 225 एनएम पिकअप टॉर्क जनरेट करेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये नवीन ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिसू शकतो. अद्ययावत Tata Nexon ला नवीन टू-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळू शकते. टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये अनेक फीचर्स मिळतील.