मारुतीची जिम्नी काय आली, महिंद्राच्या थारवर कधी नव्हे तो ६५ हजारांचा डिस्काऊंट मिळू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 01:59 PM2023-06-11T13:59:21+5:302023-06-11T13:59:37+5:30

जिम्नी थारपेक्षा सव्वा दोन लाख रुपयांनी महागडी आहे. परंतू, ती घेणारेही काही कमी नाहीएत. या पार्श्वभूमीवर थारवरील डिस्काऊंटबाबत महत्वाची माहिती येत आहे. 

Maruti's Jimny came, Mahindra's thar has started getting a discount of 65 thousand in june 2023 offer | मारुतीची जिम्नी काय आली, महिंद्राच्या थारवर कधी नव्हे तो ६५ हजारांचा डिस्काऊंट मिळू लागला

मारुतीची जिम्नी काय आली, महिंद्राच्या थारवर कधी नव्हे तो ६५ हजारांचा डिस्काऊंट मिळू लागला

googlenewsNext

दोन-चार दिवसांपूर्वी मारुतीने बहुप्रतिक्षित जिम्नी ही ऑफरोड एसयुव्ही लाँच केली आहे. याची टक्कर थेट महिंद्राच्या थारसोबत होणार आहे. यामुळे दोन्ही कंपन्यांच्या कारमध्ये लोकांनी कंपेरिझन सुरु केले आहे. जिम्नी थारपेक्षा सव्वा दोन लाख रुपयांनी महागडी आहे. परंतू, ती घेणारेही काही कमी नाहीएत. या पार्श्वभूमीवर थारवरील डिस्काऊंटबाबत महत्वाची माहिती येत आहे. 

महिंद्राच्या या कारला एवढी मागणी आहे की वर्ष दोन वर्षांचे वेटिंग आहे. असे असताना तुम्हाला डिस्काऊंट कसा मिळेल असे वाटत असेल, परंतू हे खरे आहे. हा डिस्काऊंट महिंद्र कंपनीने नाही तर कंपनीच्या साथीने डीलरकडून दिला जात आहे. महिंद्राच्या थारवर काही निवडक डीलर ४० हजार ते ६५ हजारांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहेत. जाणून घ्या Thar june 2023 Offer बाबत...

काही रिपोर्टनुसार निवडक डीलर थार एसयुव्हीवर मोठा डिस्काऊंट देत आहेत. कॅश ऑफर, कार्पोरेट डिस्काऊंट आणि एक्स्चेंज बोनस देत आहेत. काही डीलर महिंद्रा थारवर ४०००० रुपयांचा डिस्काऊंट देत आहेत. तसेच जून २०२३ मध्ये २५ हजारांचा एक्स्चेंज बोनसही दिला जात आहे. 

रिपोर्टमधील दाव्यानुसार थार एसयुव्हीच्या एलएक्स 4x4 एटी वेरिएंटवर हा डिस्काऊंट दिला जात आहे. थार ही आरडब्ल्यूडी 3 व्हेरिअंटमध्ये येते. यापैकी एटी व्हेरिअंटवर हा डिस्काऊंट दिला जात आहे. तसेच या कार लगेचच उपलब्ध केल्या जात आहेत. 

Web Title: Maruti's Jimny came, Mahindra's thar has started getting a discount of 65 thousand in june 2023 offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.