मारुतीची जिम्नी थोडी लाज राखणार, ग्लोबल एनकॅपमध्ये एवढे स्टार मिळण्याची शक्यता...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:51 PM2023-05-22T12:51:15+5:302023-05-22T12:51:25+5:30
मारुती आणि सेफ्टी रेटिंग यांचा दूरदूर कुठे संबंध नसतो. पाण्यासारख्या खपणाऱ्या अशा अनेक कार आहेत, ज्यांचे सेफ्टी रेटिंग शुन्यापासून सुरु होते.
आजच्या काळात सुरक्षित कारकडे ग्राहकांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे टाटाच्या कारना लोकांची मोठी पसंती मिळत आहे. परंतू, टाटाच्या सेवेवर अनेकजण नाराज आहेत. यातच मारुतीने आपला पहिला नंबर कायम राखला आहे तो देखील मोठ्या फरकाने. आता मारुतीने फ्राँक्स ही कार आणली आहे. तिला चांगली मागणी आहे. यातच मारुती जिप्सीची पुढील पीढी जिम्नी आणत आहे.
मारुती आणि सेफ्टी रेटिंग यांचा दूरदूर कुठे संबंध नसतो. पाण्यासारख्या खपणाऱ्या अशा अनेक कार आहेत, ज्यांचे सेफ्टी रेटिंग शुन्यापासून सुरु होते. परंतू, मारुतीच्या या जिम्नीने कमाल केली आहे. जिम्नी २०१८ मध्ये युरो एनकॅपकडे क्रॅश टेस्टसाठी पाठविण्यात आली होती. तेव्हा तिला तीन स्टार मिळाले होते.
भारतासाठी मारुती सुझुकीच्या जिम्नीची अद्याप क्रॅश टेस्ट झालेली नाहीय. परंतू, तेव्हाच्या आणि आताच्या आकड्यात फारसा फरक असण्याची शक्यता कमी आहे. युरो NCAP ला पाठविलेली कार ही तीन दरवाजांची होती. पाच दरवाजांची कार अद्याप तिथेही टेस्ट व्हायची आहे.
मारुती सुझुकी जिमनी थ्री-डोअरने फ्रंटल ऑफसेट चाचणीत 8 पैकी 4.6 गुण मिळवले तर समोरच्या पूर्ण-रुंदीच्या क्रॅश चाचणीत 8 पैकी 5.8 गुण मिळवले. प्रवाशाला चांगले पाय आणि डोक्याचे संरक्षण मिळाले, तर ड्रायव्हरला पुरेसे पायाचे संरक्षण, किरकोळ डोके संरक्षण आणि कमकुवत छातीचे संरक्षण मिळाले. एकूणच, इतर अनेक चाचण्यांसह, जिमनीने 27.9 गुण मिळवले.
मारुती सुझुकी जिमनीने मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत चांगले काम केले, एकूण 84 टक्के सुरक्षितता दिली. तर प्रौढांच्या संरक्षणासाठी 73 टक्के मिळवले. युरो आणि ग्लोबल एनकॅपमध्ये फारसा फरक नाहीय. यामुळे ग्लोबल एनकॅपच्या टेस्ट देखील याचसारख्या येण्याची शक्यता आहे.