मारुतीची सर्वात महागडी कार येतेय, एस क्रॉसला करणार रिप्लेस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:27 PM2022-07-09T18:27:49+5:302022-07-09T18:28:14+5:30
सुझुकी आणि टोयोटा या दोन कंपन्यांनी मिळून ही मारुती सुझुकी विटारा विकसित केली आहे.
मारुती विटारा एसयूव्ही उत्कृष्ट लुक तसेच अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. ही SUV किया सेल्टॉस, ह्युंदाई क्रेटा, टाटा हॅरिअर, स्कोडा कुशक आणि महिंद्रा एक्सयुव्ही ७०० सारख्या कारना टक्कर देईल.
सुझुकी आणि टोयोटा या दोन कंपन्यांनी मिळून ही मारुती सुझुकी विटारा विकसित केली आहे. यामध्ये टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर प्लॅटफॉर्म प्रमाणेच डिझाइन आणि फिचर्स असणार आहेत. मारुती विटाराची निर्मिती टोयोटाच्या कर्नाटकातील उत्पादन प्रकल्पात होत असल्याची चर्चा आहे.
मारुती विटाराला 1.5L K15C DualJet पेट्रोल युनिट तसेच Toyota चे 1.5L TNGA पेट्रोल युनिट मिळेल. एसयूव्हीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिसतील. मारुती विटारामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्टसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Maruti Suzuki Vitara ही कंपनीची सर्वात महागडी SUV असेल आणि बाजारात येताच ती प्रीमियम मध्यम आकाराची SUV Maruti Suzuki Nexa S-Cross ची जागा घेईल. मारुती सुझुकी भारतातील midsize SUV सेगमेंटमध्ये मागे आहे. या कारमुळे ती सर्व कंपन्यांना टक्कर देऊ शकणार आहे.