'या' लक्झरी सुपरकारची डिलिव्हरी भारतात सुरू, किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 02:22 PM2023-06-04T14:22:30+5:302023-06-04T14:23:28+5:30
या कारमध्ये ड्रायव्हर्स चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील निवडू शकतात.
नवी दिल्ली : मासेरातीने ( Maserati) काही महिन्यांपूर्वी MC20 सुपरकार भारतात 3.69 कोटी रुपये (एक्स-शोरूम) लाँच केली होती. आता Maserati MC20 सुपरकारचे पहिले युनिट भारतातील ग्राहकांसाठी डिलिव्हरी करण्यात येत आहे. ही कार 0-100 किमी प्रतितास 2.9 सेकंदात वेग घेऊ शकते आणि तिचा वेग 325 किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, MC20, 33 मीटरपेक्षा कमी अंतरावर 100 किमी प्रतितास वेगाने थांबू शकते.
MC20 चे इंजिन मिड-माउंट आहे, ज्यामध्ये 3.0-लिटर V6 इंजिन आहे. पण कंपनीचे म्हणणे आहे की, ते F1 चे पेटंट टेक्नॉलॉजीचा वापरत करत आहेत. कारचे इंजिन 630 hp आणि 730 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, जे फक्त मागील व्हीलपर्यंत पॉवर ट्रान्सफर करते. या कारमध्ये ड्रायव्हर्स चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील निवडू शकतात.
इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये 10.3 इंच टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जे Maserati च्या नवीन इंटेलिजेंट असिस्टंट (MIA) ला सपोर्ट करते. याशिवाय, ड्रायव्हरला 10.3-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो. इन्फोटेनमेंट सिस्टिमला पर्सनलाइज केले जाऊ शकते आणि Maserati कनेक्टद्वारे मालकाला सर्व्हिसची तारीख, सिक्योरिटी फीचर्स आणि इतर फीचर्स स्मार्टफोनद्वारे अॅक्सेस करण्याची परवानगी मिळते.
याचबरोबर, या माइल्ड हायब्रीड कारमधील विंडस्क्रीन, टाइट ओव्हरहॅंग, एअर इंटेक, नवीन ऑल एलईडी हेडलाइट यामुळे कारचा लूक खूपच छान दिसतो. सीट्स, डॅशबोर्ड आणि डोर पॅड्ससह संपूर्ण केबिन एलकांट्रा आणि स्टीच्ड लेदरसह ब्ल्यू एस्सेंटद्वारे तयार करण्यात आला आहे.