इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याची शानदार संधी, लगेच होईल 50000 रुपयांपर्यंत बचत!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 08:12 PM2023-05-30T20:12:45+5:302023-05-30T20:13:19+5:30
ही ऑफर 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनापर्यंत वैध असणार आहे.
जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर एक शानदार ऑफर आली आहे. अहमदाबादच्या इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी मॅटरने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त सवलतीच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. मॅटर एरा इलेक्ट्रिक बाइक खरेदी करून 50,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. ही ऑफर 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनापर्यंत वैध असणार आहे.
सरकारने अलीकडेच FAME II सबसिडीमध्ये काही बदल केले आहेत. हे पाहता कंपनीने मॅटर एरा 5000 (Matter Aera 5000) आणि मॅटर एरा 5000 प्लस (Matter Aera 5000 Plus) इलेक्ट्रिक बाईक्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची किंमत 30,000 रुपयांनी वाढली आहे. मात्र, आता कंपनीच्या ऑफरचा फायदा घेतल्यास मोठी बचत होणार आहे.
6 जूनपासून मॅटर एरा 5000 ची किंमत 1,73,999 रुपये असणार आहे. दुसरीकडे, मॅटर एरा 5000 प्लससाठी 1,83,999 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे 5 जूनपर्यंत बाईक बुक केल्यास तुम्हाला 30,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार नाहीत. याशिवाय, एरा इलेक्ट्रिक बाईक फक्त 999 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑटोकॅपिटलवरून ते बुक करू शकता.
बाईकची डिलिव्हरी या वर्षी सप्टेंबरपासून सुरू होईल. मॅटरच्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना थेट 30,000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय 20,000 रुपयांचे केअर पॅकेजही दिले जात आहे. कंपनी तुम्हाला एकूण 50,000 रुपयांचा फायदा देत आहे. एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स राइड्स जूनपासून सुरू होतील. कंपनी शानदार वित्त योजना देखील ऑफर करत आहे.
गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाईक
मॅटर एरा ही भारतातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाईक आहे. ज्यामध्ये 4 स्पीड हायपर-शिफ्ट गियर मिळतील. यामुळे 25 पैसे प्रति किलोमीटर मायलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे. मॅटरची इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 6 सेकंदात 60kmph चा वेग पकडू शकते. ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 125 किलोमीटरचे अंतर कापेल. ग्राहकांना 7 इंची टचस्क्रीन आणि कनेक्टेड फीचर्सचा लाभ मिळणार आहे.