अॅक्युप्रेशरचा उपयुक्त फायदा देणारे मण्यांचे सीट मॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 09:58 PM2017-10-19T21:58:42+5:302017-10-19T21:59:04+5:30

लाकडाच्या मण्यांद्वारे विणलेल्या सीट्स ड्रायव्हरच्या आसनासाठी खूप चांगल्या असतात. विशेष करून लांबच्या प्रवासात त्याचा चांगला उपयोग होतो. लांबवरच्या प्रवासासाठी ड्रायव्हिंग करणारे व्यावसायिक ड्रायव्हर्स तसे सरावलेले असतात

Matt's seat mate with a useful advantage of Acupressure | अॅक्युप्रेशरचा उपयुक्त फायदा देणारे मण्यांचे सीट मॅट

अॅक्युप्रेशरचा उपयुक्त फायदा देणारे मण्यांचे सीट मॅट

googlenewsNext

लाकडाच्या मण्यांद्वारे विणलेल्या सीट्स ड्रायव्हरच्या आसनासाठी खूप चांगल्या असतात. विशेष करून लांबच्या प्रवासात त्याचा चांगला उपयोग होतो. लांबवरच्या प्रवासासाठी ड्रायव्हिंग करणारे व्यावसायिक ड्रायव्हर्स तसे सरावलेले असतात. मात्र वैयक्तिक वापरासाठी साधारणपमे शहराम रोज गाडी वापरणारे व त्क्वचित लांबच्या प्रवासाला ड्राइव्ह करणारे आता वाढत आहेत, हे ही खरे. मात्र त्या लांबच्या प्रवासामध्ये अनेकदा सर्वात जास्त त्रास होतो तो अनेक पाठीची वा कमरेची दुखणी असणाऱ्यांना. त्याचप्रमाणे दुसरा एक त्रास असतो तो घामाचा. घामामुळे सीटवर सतत बसल्याने गरम वा उष्णतेमुळे मांडी वा पार्श्वभागाला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासामध्ये जाताना अनेकजण त्यासाठी मध्ये मध्ये छानपैकी थांबतात, आराम घेतात, पाय मोकळे करतात. मात्र अनेकदा वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याचाही प्रसंग येतो, त्यावेळी बसून बसून घामाने त्रास सुरू केलेला असतो व त्यात पाठही दुखायला लागलेली असते. अशावेळी आसन व पाश्वर्भाग यामध्ये जर बऱ्यापैकी अंतर असते, थोडी हवा खेळती राहाण्यासारखी जागा असती तर खूप बरे वाटले असते. असा विचार येतो. बाजारात आच ड्रायव्हरच्या आसनावर ठेवण्यासाठी लाकडी व प्लॅस्टिकच्या मण्यांच्या माळा द्वारे तयार केलेले एक मॅट मिळते. हे मॅट लांबच्या प्रवासाला तसे खूप चांगले आहे. विशेष करून प्लॅस्टिकपेक्षा लाकडाच्या मण्यांनी तयार केलेले मॅट अधक चांगले असते. त्यामुळे प्लॅस्टिकने होणारा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे काचेच्यासारखे मणी असणारे मटेरियलही त्यात वापरले जाते. ते ही वापरण्यास त्रासदायक नसते.
मुळात या प्रकारच्या मॅट वा सीट कव्हरमुळे ड्रायव्हरला लांबच्या प्रवासात एक प्रकारचा थकवा कमी जाणवतो.त्यामुळे मांड्यांना येणा-या  घामात काही प्रमाणात घट होते. सतत एकाच जागी असल्याने अंगाला लागणारी रग या प्रकारच्या मण्यांच्या वापरामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे लागत नाही. हा तसा उपाय साधा आहे पण त्याला चांगले व्यापारी रूप देऊन सादर केलेले आहे. त्यामुळे नुकसान काही नाही उलट फायदाच आहे. काहींना हा प्रकार अॅक्युप्रेशरचा वाटतो, पण त्याचा येथे तसा फार काही संबंध नाही. तुम्हाला कोणताही टोतचण्याचा प्रकार येथे नाही. आसनावर बसल्यानंतर सतत फोमवर संपर्क असल्याने तेथे तयार होणारी उष्णता त्रासदायक ठरू शकते, त्यावर असणारा हा साधासुधा उपाय आहे. काहींना सीटची उंची थोडीशी मोटी हवी असते. पम उशी घेतली तर ती जास्त उंच असते, त्यापेक्षा कमी उशी तयार करून घेण्यापेक्षा मण्यांच्या सीटचा उपाय चांगला वाटतो. अर्थात हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे. काहींना ते जमणारही नाही, त्यांना लांबच्या प्रवासात त्रास होतही नसेल, वातानुकूलीत यंत्रणेमुळे घामाचा त्रास नसतो. मात्र रग लागण्यासाठी व रक्तप्रवाह सुरळीत राहाण्यासाठी अशी मण्यांची सीट नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

Web Title: Matt's seat mate with a useful advantage of Acupressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार