WagonR, Swift बघतच राहिल्या, या स्वस्त कारनं मारली बाजी; झाली सर्वाधिक विक्री...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 05:49 PM2023-06-08T17:49:07+5:302023-06-08T17:49:41+5:30
मे महिन्यातही सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 कारमध्ये 7 कार एकट्या मारुती सुझुकीच्या होत्या. याशिवाय सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-3 कारही मारुती सुझुकीच्या आहेत.
भारतीय कार बाजारावर मारुती सुझुकीचा जबरदस्त दबदबा आहे. मारुती सुझुकीकडे अशा अनेक कार आहेत, ज्यांना लोकांची मोठी पसंतीस आहे. मारुती सुझुकी ही किफायती किंमतीच्या कारसाठी ओळखली जाते आणि भारतात सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या कारसाठी प्रचंड स्कोप आहे. हे मारुती सुझुकीला चांगल्या प्रकारे माहीत असल्यानेच, आज ती देशातील सर्वात मोठी कार विक्रेती कंपनी आहे. मे महिन्यातही सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 कारमध्ये 7 कार एकट्या मारुती सुझुकीच्या होत्या. याशिवाय सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-3 कारही मारुती सुझुकीच्या आहेत.
मारुती सुझुकी बलेनो ही मे 2023 मध्ये सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. या महिन्यात बलेनोच्या 18,700 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मारुती सुझुकी स्विफ्ट, स्विफ्टच्या 17,300 युनिट्सची विक्री झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे, मारुती सुझुकी वॅगनआर, हिच्या 16,300 युनिट्सची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मारुती सुझुकी स्विफ्ट आणि वॅगनआर या कारही अनेक वेळा सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार ठरल्या आहेत.
मे 2023 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या 10 कार -
1. मारुती बलेनो- 18,700 युनिट्सची विक्री
2. मारुती स्विफ्ट- 17,300 युनिट्सची विक्री
3. मारुती वॅगनआर - 16,300 युनिट्सची विक्री
4. ह्युंदाई क्रेटा- 14,449 युनिट्सची विक्री
5. टाटा नेक्सन- 14,423 युनिट्स बिकीं
6. मारुती ब्रेझा- 13,398 युनिट्सची विक्री
7. मारुती ईको- 12,800 युनिट्सची विक्री
8. मारुती डिझायर- 11,300 युनिट्सची विक्री
9. टाटा पंच- 11,100 युनिट्सची विक्री
10. मारुती एर्टिगा- 10,500 युनिट्सची विक्री
सर्वाधिक विकल्या गेलेल्या मारुती बलेनोची प्राइस रेन्ज 6.61 लाख रुपयांपासून ते 9.88 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. यात 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन (90 पीएस आणि 113 एनएम- पेट्रोलवर) येते. ही कार सीएनजीवर 77.49 पीएस आणि 98.5 एनएम टार्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5-स्पीड एएमटीचे ऑप्शन मिळते. तसेच या कारमध्ये आयडल-स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजीसह इतरही अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.