Mercedes-AMG EQE SUV: सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:52 PM2022-02-14T16:52:28+5:302022-02-14T16:52:45+5:30

Electric SUV Range 600 Km: ईलेक्ट्रीक स्कूटर कारसोबत आता ईलेक्ट्रीक एसयुव्हींचाही जमाना आला आहे. टेस्ला सारख्या कंपन्यांच्या तोंडाला फेस येणार आहे.

Mercedes-AMG EQE SUV: 600 km Range on a single charge! Do Pune-Mumbai travel twice with Electric SUV | Mercedes-AMG EQE SUV: सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे

Mercedes-AMG EQE SUV: सिंगल चार्जमध्ये ६०० किमी! पुणे-मुंबई येजा करा दोनदा; विनाटोल, SUV कडून अजून काय हवे

Next

टेस्लासारख्या कंपनीच्या तोंडाला भारतात येण्याआधीच फेस येणार आहे. कारण एकाच चार्जमध्ये मुंबई-पुणे अशा दोन फेऱ्या मारू शकता येतील अशा रेंजची एसयुव्ही येत आहे. Mercedes-Benz (मर्सिडीज-बेंज) लवकरच भारतात जबरदस्त रेंज आणि भन्नाट लूक असलेली इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच करणार आहे. कंपनीने AMG EQE चा टीझर सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 

Mercedes-AMG EQE (मर्सिडीज-एएमजी ईक्यूई) या वर्षीच्या परफॉर्मन्स इलेक्ट्रीक कार सीरीजचा भाग असणार आहे. २०२२ मध्ये मर्सिडिज इलेक्ट्रीकमध्ये सहा कार लाँच करणार आहे. जानेवारीत कंपनीने EQA चे AMG व्हर्जन आणले होते. 

टीझर व्हिडीओमध्ये कंपनीने काही फिचर्स दाखविले आहेत. याशिवाय EQE बॅजिंग, सिग्नेचर एलईडी टेललाइट्ससोबत क्रोम स्लॅट्ससोबत ब्लॅक ग्रिलवर AMG बॅजिंगही दाखविले आहे. मिड साईज एसयुव्ही मर्सिडीज-बेंजच्या EVA 2 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. 

AMG EQE EQS 53 प्रमाणेच पॉवरट्रेनसह ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. यात ड्युअल-मोटर AWD आवृत्ती मिळण्याची शक्यता आहे जी 649 hp ची पॉवर आणि 948 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ओव्हरबूस्ट मोडमध्ये, ही मोटर 751 hp पॉवर आणि 1,018 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. ड्रायव्हिंग रेंबाबत बोलायचे झाले तर मर्सिडीज-AMG EQE SUV एका पूर्ण चार्जवर सुमारे 600 किमी अंतर कापण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Mercedes-AMG EQE SUV: 600 km Range on a single charge! Do Pune-Mumbai travel twice with Electric SUV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.