7 सीटर इलेक्ट्रिक SUV साठी तयार राहा; सिंगल चार्जवर 400KM रेंज, जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 11:34 AM2022-10-18T11:34:37+5:302022-10-18T11:35:56+5:30
Mercedes Benz EQB : ही सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असून वर्षाच्या अखेरीस देशात लाँच केली जाणार आहे.
नवी दिल्ली : जर्मनीतील लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ भारतात तिसरे इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहे. पुढील इलेक्ट्रिक कारचे नाव मर्सिडीज बेंझ ईक्यूबी (Mercedes Benz EQB) असणार आहे असे कंपनीने सांगितले. तसेच, ही सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असून वर्षाच्या अखेरीस देशात लाँच केली जाणार आहे.
सध्या लाँच करण्याची नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु लाँच यावर्षी डिसेंबरमध्ये होईल,असे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी, अलीकडेच कंपनीने देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक कार EQS लाँच केली होती. दरम्यान, Mercedes-Benz EQB ही देशातील पहिली 7 सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्हीअसणार आहे. ही कार जागतिक बाजारात आधीच लाँच करण्यात आली आहे.
Mercedes-Benz EQB इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 66.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात येईल. मर्सिडीजचे म्हणणे आहे की, EQB एकदा चार्ज केल्यानंतरन 400 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. Mercedes-Benz EQB जागतिक बाजारपेठेत दोन ट्रिममध्ये येते. पहिला ऑल-व्हील ड्राइव्ह EQB 300 ट्रिम आहे, जो 225hp पॉवर आउटपुट आणि 390 Nm च्या पीक टॉर्कसह येतो.
दुसरे म्हणजे ट्रिम EQB 350 आहे, जी 288hp पॉवर आणि 521 Nm पीक टॉर्क देते. मर्सिडीजने चीनमध्ये EQB ची AMG व्हर्जनही लाँच केली आहे. तिन्ही ट्रिम भारतात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. EQB इलेक्ट्रिक एसयूव्हीची डिझाईन एका मर्सिडीज एसयूव्ही सारखीच आहे. या कारला खास डिझाईन देण्यासाठी समोर आणि मागे एक लांब लाईट स्ट्रिप दिली जाईल.
कंपनीच्या बाकीच्या इलेक्ट्रिक कार प्रमाणे कारला देखील काळ्या रंगाची ग्रिल मिळेल, ज्याच्या मध्यभागी मर्सिडीजचा लोगो असेल. कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 20-इंचाचे अलॉय व्हील दिले जातील. इंटिरिअर फीचर्समध्ये 10.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी नेव्हिगेशनसह इन्फोटेनमेंट डिस्प्लेचा समावेश आहे. Mercedes-Benz EQB ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कारपैकी एक असणार आहे. कारला अलीकडेच युरो NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे.