Mercedes-Benz Vision EQXX: जबरदस्त..! भारतात आली सर्वात दमदार Electric Car, एकदा चार्ज करा आणि महिनाभर विसरून जा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 02:07 PM2022-12-15T14:07:38+5:302022-12-15T14:08:45+5:30
या कारची रेंज वाढविण्यासाठी कारच्या छतावर एक सोलर पॅनलही सेट करण्यात आले आहे. यामुळे बॅटरीची रेंज एका दिवसात 25KM पर्यंत वाढते.
लक्झरी कार मेकर कंपनी मर्सिडीज बेन्झने काही महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारात आपली mercedes-benz EQS 580 ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. अतापर्यंत ही देशातील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक कार होती. ही कार फुल चार्जवर 857 KM ची रेंज देत होती. आता कंपनीने भारतीय बाजारात पुन्हा एकदा दमदार इलेक्ट्रिक कार Mercedes Benz Vision EQXX सादर केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर, 1000 किलोमीटरपर्यंत चालू शकते. व्हिजन EQXX ईव्हीची कन्सेप्ट याच वर्षाच्या सुरुवातीला जगासमोर सादर करण्यात आली होती.
महिनाभर चालणार बॅटरी -
कंपनीने या कारच्या परफॉर्मन्सपेक्षाही हिच्या एफिशिअन्सीवर अधिक भर दिला आहे. या कारला सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. जी 244hp (180kW) जनरेट करते. एवढेच नाही, तर 100kWh ची बॅटरीही या कारला देण्यात आली आहे. जी 900V पर्यंतची चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते.
या कारची रेंज वाढविण्यासाठी कारच्या छतावर एक सोलर पॅनलही सेट करण्यात आले आहे. यामुळे बॅटरीची रेंज एका दिवसात 25KM पर्यंत वाढते. मात्र, या सौर पॅनलमुळे रियर विंडो झाकली जाते. यामुळे गाडी चालवताना समस्या येऊ शकते. जर आपण महिन्यातील 25 दिवस रोज 20KM पर्यंत ऑफिसात जात असाल, तर या कारची बॅटरीसंपूर्ण एक महिन्यापर्यंत चालू शकते.
डिझाईन बघूनच प्रेमात पडाल -
मर्सिडीजची ही इलेक्ट्रिक कार डिझाईनच्या दृष्टीनेही आकर्षक आहे. कारच्या समोरील भागात एक LED लाइटबार देण्यात आला आहे. हिच्या बोनटवर मर्सिडीज बेन्झचा लोगो स्टिकरच्या स्वरुपात देण्यात आला आहे. तसेच हिचे डिझाइनही अत्यंत एअरोडायनॅमिक ठेवण्यात आले आहे. या कारला फ्लश डोअर हँडलही देण्यात आले आहे. या कारमध्ये बरेच रिसायकल्ड मटेरियल्स वापरण्यात आले आहेत. याच बरोबर ही एक लाइटवेटेड कार आहे. हिचे व्हर्जन केवळ 1750 किलोग्रॅम एवढे आहे.