MG Comet EV: दोन दरवाजे, चार सीट्स! सादर झाली जबरदस्त लूकसह ही मिनी EV

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:51 PM2023-04-21T12:51:59+5:302023-04-21T12:52:50+5:30

कंपनीनं याद्वारे आपली दुसरी इलेक्ट्रीक कार बाजारपेठेत लाँच केली आहे. तसंच याच्या कस्टमायझेशनचेही पर्याय देण्यात येतायत. पाहा काय आहे खास.

MG Comet EV Two Doors Four Seats Introducing this mini EV with stunning looks know features | MG Comet EV: दोन दरवाजे, चार सीट्स! सादर झाली जबरदस्त लूकसह ही मिनी EV

MG Comet EV: दोन दरवाजे, चार सीट्स! सादर झाली जबरदस्त लूकसह ही मिनी EV

googlenewsNext

मॉरिस गॅराजेसनं (MG Motor) शुक्रवारी भारतीय बाजारात नवीन MG Comet EV ही दुसरी इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली इलेक्ट्रीक मोटरनं सुसज्ज असलेली ही मिनी इलेक्ट्रीक कार प्रदर्शिक करण्यात आली. दरम्यान, याच्या किंमतीची घोषणा करण्यात आली नसून ती लवकरच सांगितली जाईल. सध्या कंपनीकडून या कारच एन्ट्री लेव्हल वेरिएंटची घोषणा केली जाईल, त्यानंतर इतर व्हेरिअंटच्या किमती जाहीर केल्या जातील. चला तर मग बघूया कशी आहे देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रीक कार.

MG Comet EV चा लुक आणि डिझाईन खूपच आकर्षक आहे, कंपनीनं तरुण वर्गाची आवड लक्षात घेऊन ते तयार केलंय. ही कार इंडोनेशियन बाजारात विकली जाणारी Wuling Air EV चं रिबॅज केलेलं व्हर्जन आहे. याला ब्रँडची पॅरेंट कंपनी SAIC च्या GSEV प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेय. कंपनीनं ही कार अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर केली असून ती दैनंदिन प्रवासासाठी उत्तम असल्याचे मानले जात आहे. आकाराच्या बाबतीत, ही इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध असलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी Tiago EV पेक्षा लहान आहे.

काय आहेत फीचर्स?
MG Comet EV चा लूक खूपच आकर्षक आहे, आकारानं लहान असूनही, कंपनीनं कारचा एक्सटिरीअर अधिक चांगल्या फीचर्सनं सुसज्ज करण्याचा प्रयत्न केलाय. यात एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइट्स, डेटाइम रनिंग लाइट्स, दरवाज्यांवर क्रो हँडल आणि 12-इंच स्टील व्हील्स देण्यात आलेत. यामुळे कारची साइड प्रोफाइलही जबरदस्त दिसते.

बॅटरी पॅक आणि परफॉर्मन्स
या कारमध्ये 17.3kWh बॅटरी पॅक देण्यात येत आहे आणि कारची इलेक्ट्रीक मोटर 41bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये 230 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल. तसंच बॅटरी 3.3kW चार्जरनं चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास घेते, तर त्याची बॅटरी केवळ 5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

कसं आहे इंटिरिअर?
Comet EV च्या इंटीरियरबद्दल बोलायचं तर, यात 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्लेला सपोर्ट करते. स्टीयरिंग व्हीलवर कंट्रोल बटन्सही देण्यात आली आहेत, ज्यांचं डिझाइन iPad द्वारे प्रेरित आहे. कीलेस एंट्री, इलेक्ट्रीकली ॲडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर, टिल्ट अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील, 50:50 स्प्लिट फोल्डिंग रिअर सीट्स कारच्या इंटिरिअरला सुंदर लूक आणतात. केबिन स्पेस ग्रे थीमनं सजवण्यात आलंय.

सुरक्षिततेचे फीचर्स
या इलेक्ट्रीक कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), रियर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक फंक्शन देण्यात आलेत. याशिवाय इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर-अनलॉक फंक्शनही दिले जात आहे.

Web Title: MG Comet EV Two Doors Four Seats Introducing this mini EV with stunning looks know features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.