शानदार 7 सीटर SUV लवकरच लाँच होणार; 4X4 आणि ADAS सारखे मिळतील फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 03:27 PM2022-08-29T15:27:36+5:302022-08-29T15:28:01+5:30

MG Motors : नवीन फीचर्ससह,एमदीची ही एसयूव्ही नुकत्याच आलेल्या Hyundai Tucson शी स्पर्धा करेल. कंपनीने नुकतीच नवीन गाडीची झलक सादर केली आहे.

mg gloster 2022 facelift to launch on 31st august in india here is the features details | शानदार 7 सीटर SUV लवकरच लाँच होणार; 4X4 आणि ADAS सारखे मिळतील फीचर्स

शानदार 7 सीटर SUV लवकरच लाँच होणार; 4X4 आणि ADAS सारखे मिळतील फीचर्स

googlenewsNext

नवी दिल्ली : नवीन 7 सीटर SUV भारतीय बाजारात येत आहे. एमजी मोटर्स (MG Motors) आपली Gloster SUV अपडेट करणार आहे. या 3-रॉ एसयूव्ही कंपनीने 2020 मध्ये भारतात लाँच केले होते. नवीन अवतारमध्ये या कारला पूर्वीपेक्षा जास्त ADAS फीचर्स दिले जातील. यात MG Astor प्रमाणे स्तर-2 ADAS फीचर्स असतील, असे म्हटले जात आहे. तसेच, नवीन फीचर्ससह,एमदीची ही एसयूव्ही नुकत्याच आलेल्या Hyundai Tucson शी स्पर्धा करेल. कंपनीने नुकतीच नवीन गाडीची झलक सादर केली आहे.

MG Motor ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ADAS फीचर्ससह नवीन Gloster ला टीझ केले आहे. कंपनी 31 ऑगस्टला ही एसयूव्ही लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "4x4 ची पॉवर, ADAS चे प्रोटेक्शन, Advance Gloster रस्त्यावर आणि तुमच्या मनात आपली छाप पाडण्यासाठी येत आहे."

दरम्यान, सध्याच्या MG Gloster सात-सीटरची किंमत 37.28 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. ADAS फीचर्ससह सुसज्ज असलेली ही एमजीची भारतातील पहिली कार होती. यात अॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि लेन डिपार्चर वॉर्निंग यांसारख्या अनेक सुविधा आहेत.

याचबरोबर, असे म्हटले जाते की 2.0-लीटर टर्बो डिझेल इंजिन नवीन एमजी ग्लोस्टरमध्ये उपलब्ध राहील. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे 218 PS पॉवर आणि 480 Nm टॉर्क जनरेट करते. यात 7 ड्रायव्हिंग मोड - स्नो, सँड, मड, रॉक, स्पोर्ट, इको आणि ऑटो मिळू शकतात. दमदार सेफ्टी फीचर्सव्यतिरिक्त, या एसयूव्हीमध्ये ड्रायव्हर सीट मसाज फंक्शन, हीडेट ड्रायव्हर यासारख्या सुविधा देखील मिळतात.

Web Title: mg gloster 2022 facelift to launch on 31st august in india here is the features details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.