MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 04:01 PM2022-03-07T16:01:06+5:302022-03-07T16:29:05+5:30

MG Motor India : ही इलेक्ट्रिक कार भारतात 2019 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाली होती, जी आता कंपनीने मोठ्या बदलांसह बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे.

mg india launched 2022 zs ev with increased range and many new features | MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

Next

नवी दिल्ली : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) 21.99 लाख रुपयांच्या सुरूवातीच्या एक्स-शोरूम किंमतीसह 2022 MG ZS EV कार अधिकृतपणे भारतात लॉन्च केली आहे. ही किंमत इलेक्ट्रिक SUV च्या बेस एक्साईट व्हेरिएंटची आहे, जी जुलै 2022 पासून ग्राहकांना उपलब्ध होईल, तर आतापासून उपलब्ध केलेल्या मॉडेलचे नाव एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक कार भारतात 2019 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाली होती, जी आता कंपनीने मोठ्या बदलांसह बाजारात पुन्हा लॉन्च केली आहे. पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या एक्सटीरिअर आणि इंटीरिअर भागात बरेच बदल करण्यात आले आहेत.

2022 MG ZS EV ला एक बदलेला लूक देण्यात आला आहे, जो नवीन ग्रिलसह येतो, ज्यामुळे कार खूपच स्टाइलिश वाटते. इलेक्ट्रिक एसयूव्हीला 17-इंच टॉमाहॉक हब डिझाइन अलॉय व्हील देण्यात आली आहेत, याशिवाय कारला सर्वत्र एलईडी लाइट्स देण्यात आले आहेत. नवीन ZS EV च्या केबिनमध्ये जास्त फीचर्स जुन्या मॉडेलसाठी घेतले आहेत, ज्यामध्ये कन्व्हीनिएंस आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.

SUV ला प्रीमियम लेदर कव्हर डॅशबोर्ड, ड्युअल-पेन पॅनोरॅमिक स्काय रूफ, रिअर सेंटर हेडरेस्ट, कप होल्डर्ससह रिअर सेंटर आर्मरेस्ट आणि मागील एसी व्हेंट्स मिळतात. केबिनमध्ये 10.1-इंचाची एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. कंपनीने 7-इंच एलईडी ड्रायव्हर्स डिस्प्ले, 5 यूएसबी पोर्ट, वायरलेस फोन चार्जिंग, एअर फिल्टर, डिजिटल ब्लूटूथ की यांसारखे अनेक फीचर्स दिले आहेत.

सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज
MG India ने या इलेक्ट्रिक एसयूव्हीला 50.3 किलोवॅट-आर बॅटरी पॅक दिला आहे, जो IP69 वॉटरप्रूफ रेटिंग आहे. एसयूव्ही आता एका चार्जवर 461 किमी प्रवास करते आणि 176 पीएस पॉवर बनवते, 0-100 किमी/ताशी वेग घेण्यासाठी फक्त 8.5 सेकंद लागतात. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही इलेक्ट्रिक एसयूव्ही मजबूत आहे, ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज, iSmart कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, लेन चेंज असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, 360-डिग्री कॅमेरा, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांचा समावेश आहे.

Web Title: mg india launched 2022 zs ev with increased range and many new features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.