भारतात MG ला मिळाली नवी ओळख; JSW ग्रुपसोबत डील, EV स्पोर्ट्सकार केली लॉन्च...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 04:26 PM2024-03-21T16:26:07+5:302024-03-21T16:33:06+5:30
MG Motor India: JSW ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये मोठा हिस्सा विकत घेतला आहे.
JSW MG Motor India Pvt Ltd: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी MG Motors ला आता नवीन ओळख मिळाली आहे. एमजी मोटर इंडिया अनेक दिवसांपासून भारतात एका पार्टनरच्या शोधात होती. कंपनीला आता तिचा पार्टनर मिळाला. JSW ग्रुपने एमजी मोटर इंडियामध्ये सुमारे 35% हिस्सा विकत घेतला आहे. त्यामुळे आता कंपनीचे नाव JSW MG Motor India Pvt Ltd झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MG ची मूळ कंपनी SAIC असून, ती एक चीनी कंपनी आहे. भारत आणि चीनमधील खराब संबंधांमुळे एमजीला चीनमधून निधी मिळवण्यात अडचणी येत्या होत्या. त्यामुळे कंपनीच्या कामकाजावर आणि विस्तारावर परिणाम होत होता. पण, आता एका भारतीय कंपनीची साथ मिळाल्यामुळे एमजीला आपल्या विस्तार करण्यात अडचणी येणार नाहीत.
Our event with @TheJSWGroup brought together media, stakeholders, and innovators, all energized for the future. Together with JSW, we are poised to become stronger, more innovative, and more impactful than ever before. #JSWMGMotorIndia#DriveFuturepic.twitter.com/hdYSmaaGFz
— Morris Garages India (@MGMotorIn) March 21, 2024
आज मुंबईत आयोजित इव्हेंटमध्ये JSW MG Motor India Private Limited ने सांगितले की, यापुढे कंपनी दर 3 ते 6 महिन्यांनी एक नवीन उत्पादन लॉन्च केले जाईल. त्याची सुरुवात यंदाच्या सणासुदीपासून होईल. तसेच, कंपनीचे लक्ष नवीन उर्जेवर, म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांवर असेल आणि देशातील EV इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी कंपनी प्रयत्न करेल. लवकरच कंपनी त्यांची उत्पादन क्षमता सध्याच्या 1 लाखावरुन 3 लाख करेल. कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरण राखणे आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, हे कंपनीचे ध्येय आहे. 2030 पर्यंत न्यू एनर्जी व्हेईकल क्षेत्रात आघाडीवर राहण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
या नवीन भागीदारीबद्दल बोलताना एमजी मोटर इंडियाचे सीईओ राजीव छाबा म्हणाले, जेएसडब्ल्यू ग्रुपच्या रुपात आम्हाला भारतात एमजी ब्रँडच्या वाढीसाठी एक चांगला भागीदार मिळाला आहे. तर, JSW चे प्रशासकीय समिती सदस्य पार्थ जिंदाल यांच्या मते MG Motor India आणि JSW हा एक महत्त्वाचा संयुक्त उपक्रम आहे.
नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च
The MG Cyberster dazzled at our MG Motor x @TheJSWGroup merger event, symbolizing our dedication to innovation & sustainability. This electric sportscar promises an electrifying experience!#MGCyberster#MGxJSWpic.twitter.com/szyF6WA2s8
— Morris Garages India (@MGMotorIn) March 20, 2024
एमजी मोटर इंडियाने या कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार सायबरस्टर सादर केली. ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार भारतात लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे पण कधी, याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ही लॉन्च झाली, तर नवीन फ्लॅगशिप ब्रँड अंतर्गत किंवा अधिक प्रीमियम डीलर नेटवर्कद्वारे विकली जाऊ शकते. MG आणि JSW ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत नवीन फ्लॅगशिप ब्रँड तयार केला जाऊ शकतो.
कशी आहे कार?
एमजी सायबरस्टर कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार आहे. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असू, कारची लांबी 4,533 मिमी, रुंदी 1,912 मिमी आणि उंची 1,328 मिमी आहे. कारचा व्हीलबेस 2,689mm आहे. ही कन्व्हर्टेबल टू डोअर स्पोर्ट्सकार आहे. पुढचा भाग स्वीपबॅक हेडलाइट्ससह खूपच आकर्षक दिसतो. या इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकारमध्ये 77kWh बॅटरी पॅक असू शकतो. याची इलेक्ट्रिक मोटर 535hp पॉवर आणि 725Nm टॉर्क जनरेट करेल. कंपनीचा दावा आहे की, ही स्पोर्ट्सकार केवळ 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग घेऊ शकते आणि एका पूर्ण चार्जवर 580 किमीची रेंज देऊ शकते.