MG करणार छोटा पॅकेटमध्ये मोठा धमाका! लॉन्च करणार सर्वात स्वस्त मिनी इलेक्ट्रिक कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:12 PM2023-02-23T15:12:54+5:302023-02-23T15:14:43+5:30
एमजी मोटर भारतात लवकरच आपली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार Air EV लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे.
नवी दिल्ली-
एमजी मोटर भारतात लवकरच आपली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार Air EV लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे. नुकतीच या कारची चाचणी केली जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. भारतातील रस्त्यांवर ही कार पहिल्यांदाच दिसली असंही नाहीय. याआधी अनेक रिपोर्ट्समध्ये या कारची चाचणी केली जात असल्याचा दावा करण्यात आला होता. Air EV कार हे Wulling Air EV चं एक रिबॅज व्हर्जन आहे. हे ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर केलं जाणार होतं. कंपनी कंपनीनं तेव्हा टाळलं होतं. आता येत्या काही महिन्यात ही कार लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
MG Air EV च्या स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार या कारमध्ये LEP-सेल बॅटरी पॅकचा वापर केला जाणार आहे. ज्याची क्षमता जवळपास 20 ते 25kWH इतकी असणार आहे. कार साइजमध्ये छोटी दिसत असली तरी तिची रेंज जवळपास सिंगल चार्जमध्ये २०० ते ३०० किमी इतकी असणार आहे. कंपनी Air EV ला सिटि इलेक्ट्रिक कार म्हणून सादर करणार आहे.
असे असू शकतात फिचर्स
कारच्या फ्रंटमध्ये एक LED लाइट बार दिला जाऊ शकतो. तसंच खाली मध्यभागी चार्जिंग पॉइंट देण्यात येणार आहे. Air EV मध्ये व्हर्टिकल स्टॅक्ड ड्युअर-बॅरल हेडलाइट युनिट दिलं जाऊ शकतं. ही कार अगदी Wulling Air EV सारखीच आहे. डॅशबोर्डमध्ये ट्विट डिस्प्ले देण्यात आला आहे. एसी वेंट स्लिमर देखील आहे आणि इन्फोटेन्मेंट युनिट देण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ४ सीटरच्या या ईव्हीला दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये सादर केलं जाऊ शकतं. ज्यात 17.3kWh आणि 26.7kWh बॅटरीचा समावेश आहे. ज्यात अनुक्रमे २०० किमी आणि ३०० किमी रेंज दिला जाऊ शकते.
किंमत किती?
एमजी मोटर इंडिया या कारमध्ये काही खास बदल करण्याची शक्यता आहे. क्लायमेट कंट्रोल आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. जेणेकरुन कार भीषण उष्णता आणि वातावरणातील बदल सहज सहन करू शकेल. या इलेक्ट्रिक कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. अद्याप किमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. यासाठी कारच्या लॉन्चिंगची वाट पाहावी लागेल.