MG Motors ची Reliance Jio सोबत हातमिळवणी, आगामी कार्समध्ये येणार विशेष 'कनेक्टेड टेक्नॉलॉजी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:47 PM2021-08-03T16:47:17+5:302021-08-03T16:55:16+5:30

MG Motors, Reliance Jio New Technology : रिलायन्स जिओ आणि एमजी मोटर्स करणार एकत्र काम. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी दोन्ही कंपन्यांची हातमिळवणी.

MG Motors to join hands with Reliance Jio in upcoming trains with special connected technology | MG Motors ची Reliance Jio सोबत हातमिळवणी, आगामी कार्समध्ये येणार विशेष 'कनेक्टेड टेक्नॉलॉजी'

MG Motors ची Reliance Jio सोबत हातमिळवणी, आगामी कार्समध्ये येणार विशेष 'कनेक्टेड टेक्नॉलॉजी'

Next
ठळक मुद्देरिलायन्स जिओ आणि एमजी मोटर्स करणार एकत्र काम.अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी दोन्ही कंपन्यांची हातमिळवणी.

मॉरिस गॅरेजेसने (MG Motors) आपली वाहने भारतीय बाजारपेठेत आणखी चांगल्या आणि प्रगत कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह सुसज्ज करण्यासाठी देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी जिओशी हातमिळवणी केली आहे. आता या दोन कंपन्या भारतीय एसयूव्ही बाजारात एक अत्याधुनिक 'कनेक्टेड कार सोल्यूशन' आणण्यासाठी एकत्र काम करतील. एमजी मोटर इंडियाने आज इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) स्पेसमध्ये भारतातील अग्रगण्य डिजिटल सेवा पुरवठादार रिलायन्स जिओसह भागीदारीची घोषणा केली.

एमजी मोटर इंडिया हेक्टर, हेक्टर प्लस, ग्लॉस्टर आणि झेडएस इलेक्ट्रिक एसयूव्ही सारख्या मॉडेल्सची भारतीय बाजारपेठेत विक्री करते. आता कंपनी Reliance Jio च्या इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सीमलेस इंटिग्रेशन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्या आगामी मॉडेल्ससाठी करेल. कंपनीचा दावा आहे की एमजीच्या मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या ग्राहकांना जिओच्या सुधारित इंटरनेट आउटरीचसह महानगरांमध्येच नव्हे तर लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील हाय क्वालिटी कनेक्टिव्हीटीचा फायदा होईल. 

मिळणार अनेक फायदे
सध्या भारतीय बाजारपेठेत नवीन वाहनांमध्ये कनेक्टेड तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला जात आहे. एमजी बद्दल सांगायचं झालं तर कंपनीने आपली एसयूव्ही हेक्टर भारतीय बाजारात पहिली इंटरनेट कार म्हणून सादर केली. जिओचं हे कनेक्टेड व्हेईकल सोल्युशन हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हीटीचं कॉम्बिनेशन आहे. हे चालत्या फिरत्या वाहनांना आणि लोकांना ट्रेंडिंग इन्फोटेन्मेंट आणि रियल टाईम टॅलिमॅटिक्सपर्यंत पोहोचवण्यास सक्षम करतो.

“तंत्रज्ञान आणि नवकल्पना ऑटोमोबाईल उद्योगात जोडलेल्या कारच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या उपकरणांवर लक्ष केंद्रित करणे हा वाढता ट्रेंड पाहत आहे आणि IoT स्पेसमध्ये Jio सोबत भागीदारी केल्याने आमच्या पुढील मध्यम आकाराच्या कनेक्टेड SUV चा ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्तम आणि अधिक सोयीस्कर होईल याची खात्री आहे. यामुळे ग्राहकांना टेक्नॉलॉजी सपोर्टेड सिक्युरिटी मिळेल,” असं मत एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चावा म्हणाले. 

अनेक नवे फीचर्स होते
MG Motors नं भारतीय बाजारपेठेत आपल्या वाहनांमध्ये असे काही विशेष फीचर्स सामील केले होते, जे पहिल्यांदाच पाहायला मिळाले हेत. इंटरनेट/कनेक्टेड कार, एडीएएस तंत्रज्ञान आदींचा समावेश करण्यात आला होता. कंपनीनं आपल्या प्रीमिअम एसयूव्ही ग्लॉस्टरला लेव्हल १ ऑटोनॉमस फीचर्ससोबत बाजारात उतरवलं होतं. 

Web Title: MG Motors to join hands with Reliance Jio in upcoming trains with special connected technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.