देशातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार, फीचर्स जाणून घेतल्यावर तुम्हीही व्हाल फॅन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 06:04 PM2023-06-05T18:04:18+5:302023-06-05T18:05:30+5:30

कंपनीचा दावा आहे की, ही कार कॅमेरा-सेन्सर सूटमुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीत आणि हवामानात चालवता येऊ शकते.

minus zero unveiled first self driving car of india see detail | देशातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार, फीचर्स जाणून घेतल्यावर तुम्हीही व्हाल फॅन! 

देशातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार, फीचर्स जाणून घेतल्यावर तुम्हीही व्हाल फॅन! 

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील ऑटोनॉमस कारची कॉन्सेप्ट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय स्टार्टअपने देशातील पहिल्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचे अनावरण केले आहे. बंगळुरू स्थित AI स्टार्टअप मायनस झिरोने (Minus Zero) झीपॉडचे (zPod) प्रात्यक्षिक केले आहे. जागतिक स्तरावर दाखविण्यात आलेल्या इतर काही ऑटोनोमस वाहनांप्रमाणे ही कॉन्सेप्ट देखील टोस्टरच्या आकाराची आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार कॅमेरा-सेन्सर सूटमुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीत आणि हवामानात चालवता येऊ शकते.

मायनस झिरो zPod चे सर्वात वेगळे फीचर्स म्हणजे त्यामध्ये स्टीयरिंग व्हील नाही. त्याऐवजी, ते ट्रॅफिकसह ड्रायव्हिंगच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी धोरणात्मकरित्या ठेवलेल्या उच्च-रिझोल्यूशन कॅमेर्‍यांची एका सीरीजची मालिका वापरते. स्टार्टअपचे म्हणणे आहे की,  या ऑटोनॉमस कारला लेव्हल 5 ऑटोनॉमीपर्यंत वाढविली जाऊ शकते, जी सेल्फ-ड्रायव्हिंग कारमध्ये सर्वाधिक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, लेव्हल 5 ऑटोनॉमस असलेली कोणतीही कार कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चालविण्यास सक्षम आहे.

zPod चा कॅमेरा-सेन्सर सूट वाहनाच्या सभोवतालच्या रिअल-टाइम प्रतिमा कॅप्चर करू शकतो आणि त्यामध्ये एम्बेड केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सिस्टमसह शेअर करू शकतो. यामध्ये वापरलेले AI येणारे अडथळे टाळण्यास, कारला नेव्हिगेट करण्यास आणि त्याचा वेग नियंत्रित करण्यास मदत करते. ही कार सेन्सर्सऐवजी कॅमेरा टेक्नॉलॉजीवर काम करते. स्टार्टअपचे म्हणणे आहे की, ऑटोनोमस कार कॅम्पसच्या आत, जसे की एक संलग्न आणि नियंत्रित क्षेत्राच्या आत खूप उपयुक्त ठरू शकतात.

काय आहे कंपनीचा प्लॅन?
मायनस झिरो भारतीय रस्त्यांसाठी उपयुक्त ऑटोनोमस वाहने विकसित करण्यासाठी AI वापरण्याची योजना आखत आहे. कंपनी पुढील दोन वर्षांत स्थिर नियामक नियमांसह सार्वजनिक रस्त्यांसह परदेशातील बाजारपेठांमध्ये आपल्या वाहनांच्या चाचणीचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. त्यांचे तंत्रज्ञान इतर कार निर्मात्यांसह त्यांच्या वाहनांमध्ये प्रगत ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम्स (ADAS) विकसित करण्यासाठी सामायिक करण्याचे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: minus zero unveiled first self driving car of india see detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.