चमत्कार! टियागो, अल्ट्रॉझ, नेक्स़ॉन; टाटाच्या गाड्यांचे मायलेज 2.5 किमी प्रति लीटरपर्यंत वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 03:19 PM2023-03-24T15:19:55+5:302023-03-24T15:20:50+5:30
टाटाने आपल्या कारच्या मायलेजचे आकडे जाहीर केले आहेत. टियागो, टिगॉर, पंच, अल्ट्रॉझसह अन्य टाटा कारचे मायलेज वाढले आहे.
टाटाने गेल्याच महिन्यात त्यांच्याकडील गाड्या अपडेट केल्या होत्या. यामध्ये टियागोपासून अगदी सफारीपर्यंतच्या कार होत्या. या कार अपडेट करताच त्यांचे मायलेजही वाढले आहे. याला कारण बीएस ६ II ठरले आहे.
पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट...
टाटाने आपल्या कारच्या मायलेजचे आकडे जाहीर केले आहेत. टियागो, टिगॉर, पंच, अल्ट्रॉझसह अन्य टाटा कारचे मायलेज वाढले आहे. टाटा टियागो पूर्वी 19.01 किमी/लीटर मायलेज द्यायची, ती आता 20.01kmpl झाला आहे. तर टिगॉरचे मायलेजही 19.60 किमी प्रति लीटर झाले आहे.
टाटा पंचच्याही मायलेजमध्ये १.१३ किमी प्रति लीटरची वाढ झाली आहे, ही कार आता २०.१० चे मायलेज देते. अल्ट्रॉमध्ये पेट्रोल ०.७०, डिझेल ०.६० एवढी वाढ झाली आहे. नेक्सॉनमध्ये पेट्रोल मॉडेलमध्ये ०.७५ किमी प्रति लीटर, डिझेल मॅन्युअल २.१० किमी प्रति लीटर आणि एएमटीमध्ये २.४० किमी प्रति लीटरची वाढ झाली आहे. यानुसार नेक्सॉन डिझेल आता २१.७० वरून थेट २४.१० चे मायलेज देणार आहे.
BS6 फेज II उत्सर्जन नियम लागू होताच टाटाने कारच्या वॉरंटीतही मोठा बदल केला आहे. पुर्वीची ७५ हजार किंवा दोन वर्षांची वॉरंटी वाढवून १ लाख किंवा तीन वर्षे केली आहे.