Renault Triber वर बंपर डिस्काउंट; ग्राहक 50,000 रुपयांपेक्षा जास्त करू शकतील बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 06:02 PM2022-07-20T18:02:06+5:302022-07-20T18:02:24+5:30
Renault Triber : रेनॉल्ट ट्रायबरवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 44,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट दिला जात आहे, तसेच तुम्हाला स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट दिला जात आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. खरंतर, ट्रायबर ही भारतातील सर्वात स्वस्त एमपीव्ही आहे आणि आता कंपनी यावर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला या डिस्काउंचा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.
रेनॉल्ट ट्रायबरवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 44,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट दिला जात आहे, तसेच तुम्हाला स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट दिला जात आहे. एकूणच 54,000 रुपयांचा डिस्काउंच मिळत आहे. दरम्यान, ग्राहक अटी व नियमांसह 5,999 रुपयांच्या EMI वर ही एमपीव्ही घरी घेऊ जाऊ शकतात. या एमपीव्हीची सुरूवातीची किंमत 5,91,800 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
भारतात उपलब्ध असलेल्या ट्रायबरमध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6250 rpm वर 72 PS पॉवर आणि 3500 rpm वर 96 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. रेनॉल्ट ट्रायबरमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट आणि पेडेस्ट्रियन प्रोटेक्शन सारखे सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड म्हणजेच सर्व व्हेरिएंटमध्ये आहे. टॉप व्हेरियंटमध्ये 2 आणखी एअरबॅग्ज म्हणजेच एकूण 4 एअरबॅग दिल्या आहेत.
दरम्यान, ही एक अतिशय स्टायलिश एमपीव्ही आहे, जी एसयूव्ही सारखी डिझाइन ऑफर करते. यामध्ये जागेची कमतरता नाही. इतकेच नाही तर ही एमपीव्ही सुरक्षिततेच्या बाबतीतही खूप पुढे आहे. जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या कारमधून प्रवास करत असाल तर लांबच्या प्रवासातही तुम्हाला मोठा आराम मिळू शकतो.