World's Most Expensive Bike: 'ही' ठरली जगातील सर्वात महागडी बाईक; किंमत आहे ८१,७५,३८,१५० रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 08:23 PM2021-11-21T20:23:49+5:302021-11-21T20:24:36+5:30
Neiman Marcus Limited Edition Fighter ही जगातील सर्वात महागडी बाईक आहे. पाहा काय आहे या बाईकमध्ये खास.
World's Most Expensive Bike Neiman Marcus Limited Edition Fighter : तुम्हाला माहितीये जगातील सर्वात महागडी बाईक कोणती आहे? ही बाईक खरेदी करणं प्रत्येकाचंच स्वप्न ठरेल असंही म्हणता येऊ शकतं. या बाईकचं नाव आहे नीमन मार्कस लिमिटेड एडिशन फायटर (Neiman Marcus Limited Edition Fighter). पाहूया काय खास आहे या बाईकमध्ये ज्यामुळे ही बाईक जगातील सर्वात महागडी बाईक ठरत आहे.
नाम नीमन मार्कस लिमिटेड एडिशन फायटरची किंमत 11 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये जवळपास 81.75 कोटी रूपये (81,75,38,150) इतकी आहे. या बाईकचा लिलाव 110,000 डॉलर्सपासून सुरू झाला होता. परंतु अखेरीस ही बाईक 100 पट अधिक किंमतीत म्हणजेच 11 मिलियन डॉलर्सला विकली गेली. कंपनीनं या बाईकचे केवळ 45 मॉडेल्स तयार केले आहेत. यासाठीच या बाईकचं नावही लिमिटेड एडिशन असं ठेवण्यात आलंय.
कंपनीनं तयार केली युनिक बाईक
नीमन मार्कस कंपनी ही कोणतीही ऑटोमोबाईल कंपनी नाही, तर लक्झरी डिपार्टमेंट स्टोअर ब्रान्ड आहे. परंतु या कंपनीनं मोटरसायकल जेव्हा लिलावासाठी लाँच केली तेव्हा याची इतकी बोली लागली की ही जगातील सर्वात महागडी बाईक ठरली. दरम्यान, ही बाईक जशी दिसते त्यापेक्षाही ही अधिक उत्तम असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
काय आहे खास?
ही बाईक अवघ्या काही सेकंदात 300 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच या बाईकची बॉडी टायटॅनियम, अॅल्युमिनिअम आणि कार्बन फायबरनं तयार केली आहे. याशिवाय या बाईकचा लूकही उत्तम आहे. या बाईकला 'इव्होल्यूशन ऑफ द मशीन' असं म्हटलं गेलं होतं. यात 120ci 45-डिग्री एअर-कूल्ड V-Twin इंजिन देण्यात आलं आहे. यामुळे ही बाईक अधिक शक्तिशाली बनते.