'या' आहेत देशातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कार, फक्त करोडपतींनाच परवडतील का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:05 PM2023-07-26T19:05:43+5:302023-07-26T19:06:03+5:30

Mercedes-Benz कंपनी भारतात आपली ercedes EQS 53 लक्झरी इलेक्ट्रिक कार 2.45 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्री करते.

most expensive electric cars in india mercedes eqs 53 porsche taycan ev bmw i7 | 'या' आहेत देशातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कार, फक्त करोडपतींनाच परवडतील का?

'या' आहेत देशातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कार, फक्त करोडपतींनाच परवडतील का?

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात जगातील तिसरे सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट आहे. देशांतर्गत मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये विविध प्रकारच्याकार उपलब्ध आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला देशातील 3 सर्वात महागड्या इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. ज्या विकत घेण्यासाठी तुम्हाला करोडपती व्हावे लागेल. या यादीत Mercedes, Audi आणि Porsche च्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे, त्याबद्दल  जाणून घ्या...

ercedes EQS 53
Mercedes-Benz कंपनी भारतात आपली ercedes EQS 53 लक्झरी इलेक्ट्रिक कार 2.45 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्री करते. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर 500 किलोमीटरहून अधिक ड्राइव्ह रेंज देऊ शकते. दरम्यान, देशातील पहिले स्थानिकरित्या असेम्बल केलेले लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आणि 14 वे 'मेड इन इंडिया' मर्सिडीज-बेंझ मॉडेल आहे. जर तुम्ही अॅडव्हॉन्स फीचर्ससह सुसज्ज असलेली लक्झरी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मर्सिडीज EQS 53 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

Porsche Taycan EV
Porsche Taycan EV भारतीय बाजारपेठेत 2.31 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. ही किंमत कारच्या टर्बो एस व्हेरिएंटसाठी आहे, जी सिंगल चार्जवर 450 किमी पेक्षा जास्त रेंज ऑफर करते. या कारला इलेक्ट्रिक मोटरसह 93.4kWh बॅटरी पॅक मिळतो, जो 751 hp पॉवर आणि 1050 Nm टॉर्क निर्माण करतो.

BMW i7
BMW i7 लक्झरी सेडान ही देशातील तिसरी सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 1.95 कोटी रूपये आहे. कार सिंगल चार्जवर 635 किमीची WLTP प्रमाणित रेंज प्रदान करण्यास सक्षम आहे. तसेच, 536 hp पॉवर आणि 745 Nm टॉर्क निर्माण करणार्‍या ड्युअल मोटर्ससह 101.7 kWh बॅटरी पॅक मिळवते. जर तुम्हाला BMW आवडत असेल आणि तिची लक्झरी कार घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Web Title: most expensive electric cars in india mercedes eqs 53 porsche taycan ev bmw i7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.