मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅश गार्ड हे चालकाच्या नव्हे तर इंजिनच्या संरक्षणासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 08:00 AM2017-09-30T08:00:00+5:302017-09-30T08:00:00+5:30

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅशगार्ड हे मोटारसायकलीला अपघातामध्ये काही प्रसंगामधून संरक्षित करते, इंजिनाला किमान धक्का बसेल अशी ती रचना असते.

Motorbike's Front Crash Guard is not meant for the driver but for the protection of the engine | मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅश गार्ड हे चालकाच्या नव्हे तर इंजिनच्या संरक्षणासाठी

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅश गार्ड हे चालकाच्या नव्हे तर इंजिनच्या संरक्षणासाठी

Next

मोटारसायकलीचे फ्रंट क्रॅशगार्ड हे मोटारसायकलीला अपघातामध्ये काही प्रसंगामधून संरक्षित करते, इंजिनाला किमान धक्का बसेल अशी ती रचना असते. मात्र ते चालकाच्या पायाच्या संरक्षणाचा भाग नाही.मोटारसायकलींचे प्रमाण आज चांगलेच वाढले आहे. मोटारसायकलीला स्कूटरसारखी बाहेरून झाकणारी वा संरक्षण देणारी काही विशिष्ट रचना नसते.

मात्र विविध प्रकारचे लोखंजी, स्टीलचे गार्ड्स या मोटारसायकलींसाठी बाजारात मिळतात. सर्वच प्रकारचे हे गार्डस वा रॉड हे प्रत्येक मोटारसायकलीला लावलेले असतात असे नाही. मात्र काही महत्त्वाचे गार्ड्स हे मोटारसायकलीसाठी आवश्यक असतात. मोटारसायकलीचे अपघातामध्ये वा अगदी स्टॅण्डवरून पडतानाही काही महत्त्वाच्या भागाचे संरक्षण व्हावे यासाठी अशा प्रकारचे संरक्षक गार्ड्स वा रॉडद्वारे तयार केलेली एक रचना गरजेची असते. त्यामधील एक म्हणजे फ्रंट क्रॅश गार्ड.

हे गार्ड नेमके कशासाठी असते, असा प्रश्न अनेकांना पडतो, काहींना वाटते, पायाला त्यामुळे संरक्षण मिळते, अपघाताच्यावेळी पुढे क्रॅश गार्ड असल्याने काही आपटण्यापासून पायाला संरक्षण मिळते, असेही वाटते. मात्र शास्त्रीयदृष्ट्या तसे नाही. क्रॅशगार्ड हे अपघातामध्ये वा अतिमोठ्या खड्ड्यामध्ये मोटारसायकल आपटली गेली व त्यामुळे मोटारसाकलच्या पुढे असलेल्या इंजिन व संलग्न भागाला नुकसान होऊ नये, यासाठी लावण्याची पद्धत आहे. ते ही विशिष्ट आकाराचे असते. काहीवेळा स्टाइल म्हणून एक आडवा सिंगल बार लावला जातो, अशा प्रकारच्या सिंगल बारला क्रॅशगार्ड म्हणता येत नाही. अपघाताच्यावेळी चालकाच्या पायाला, गुडघ्याला, घोट्याला संरक्षण मिळावे, समतोल साधण्यासाठी त्यावर पाय ठेवता यावा, अशा संरक्षणात्मक कामासाठी हे प्रभावी साधन नव्हे हे पहिले लक्षात ठेवायला हवे. यामुळेच मोटारसायकल घेतल्यानंतर त्या मोटारसायकलीला कोणत्या पद्धतीचे क्रॅशगार्ड लावायचे, कोणत्या ाकाराचे लावायचे याचा पूर्ण विचार करूनच ते लावावे. फॅशन वा स्टाइल म्हणून नव्हे.

साधारणपणे क्रॅशगार्डमुळे मोठ्या अपघाताच्यावेळी चालक फेकला गेल्यास क्रॅशगार्डमध्ये पाय अटकण्याचा संभव नसतो. मात्र फार वेग नसताना मोटारसायकल जमिनीवर घासत गेली तर किंवा अिधक वेग असतानाही ती एका बाजूला पडली व घासत गेली तर क्रॅशगार्डमुळे मोटारसायकलीच्या इंजिनाच्या भागाला धक्का कमी बसतो, कारण या गार्डमुळे जमिनीमध्ये व इंजिनामध्ये एक गॅप तयार होते. जमिनीपासून इंजिन काही अंतरावर राहाते. अर्थात त्यामुळे पाय अडकण्याचा संभव असू शकतो, त्यावेळी पायाला या गार्डपासून काही संरक्षम मिळत नाही उलट त्रास होतो. पाय अडकणे, घसरण थांबल्यानंतर बाहेर पडायला त्रास होणे अशा प्रकाराने अपघातापासून होणारी शारीरीक इजा होणारच. पायाचा गुडघा व अँकल, तसेच हाडाचा भाग यासाठी स्वतंत्र वेगळे गार्ड असते. अर्थात ते वापरण्याची भारतात पद्धतच नसते. इतके सामान कोण घेणार, ते ठेवणार कुठे हा प्रश्न असतो. हेलमेटही नाकारणारा भारतीय मानसिकतेचा भाग विचारात घेतला तर हे लक्षात येऊ शकेल. मात्र एक खरे की मोटारसायकलीला असणारे क्रॅशगार्ड प्रामुख्याने इंजिन व मोटारसायकलीचे काही भाग याचे बर्याच प्रमाणात संरक्षण करू शकते, अर्थात ते सारे अपघातात कोणत्या प्रकारे मोटारसायकल असते, त्यावरच अवलंबून आहे.

Web Title: Motorbike's Front Crash Guard is not meant for the driver but for the protection of the engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.