MS Dhoni TVS ronin : कॅप्टन कूल MS Dhoni च्या ताफ्यात नवी बाईक; दमदार फीचर्स अन् किंमत फक्त 1.5 लाख...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 02:32 PM2023-02-19T14:32:29+5:302023-02-19T14:43:35+5:30
TVS ronin motorcycle: धोनीला महागड्या बाईक्सची खूप आवड आहे, पण आता त्याच्या ताफ्यात एक स्वस्त बाईक आली आहे.
MS Dhoni TVS ronin : अनेकांना माहित आहे की, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला (Mahendra singh dhoni) पॉवरफुल-महागड्या बाईक्सचा शौक आहे. धोनीच्या घरी एक मोठे गॅरेज असून, तिथे त्याने आपले बाईकचे कलेक्शन ठेवले आहे. या कलेक्शनमध्ये आता एक नवीन बाईक अॅड झाली आहे. धोनीच्या ताफ्यात TVS Ronin आली आहे. या बाईकची किंमत फक्त 1.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने गेल्या वर्षीच ही बाईक लॉन्च केली होती.
कंपनीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम हँडलवर धोनीचे बाईकसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. TVS मोटर कंपनीचे बिझनेस हेड विमल सुंबली धोनीला चाव्या देताना या फोटोत दिसत आहेत. दरम्यान, या नवीन TVS Ronin व्यतिरिक्त धोनीकडे अनेक बाईक्स आहेत. त्याच्याकडे Confederate X132 Hellcat, Harley Davidson Fat Boy, Kawasaki Ninja ZX-14 आणि Kawasaki Ninja H2 सारख्या बाईक्स आहेत. याशिवाय त्याच्याकडे सुझुकी शोगुन, यामाहाआरएक्स100 आणि यामाहा आरडी350 सारख्या क्लासिक बाईक्सही आहेत.
TVS Ronin
TVS ने या बाईकचे 3 व्हॅर्जनमध्ये लॉन्च केले आहे. याच्या बेस व्हेरिएंटला सिंगल टोन कलर आणि सिंगल चॅनल एबीएस मिळतो. तर, टॉप व्हेरिएंटमध्ये ट्रिपल टोन कलरसह ड्युअल चॅनल एबीएस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या बाईकमध्ये ग्राहकाला एकूण 6 कलर ऑप्शन्स मिळतात. याला आकर्षक करण्यासाठी बाईकच्या पुढील भागात गोल एलईडी हेडलॅम्प आणि त्यात T आकाराचे डीआरएल देण्यात आले आहेत.
परफॉर्मन्स
कंपनीने TVS Ronin मध्ये 225.9cc एअर/ऑइल-कूल्ड इंजिन दिले आहे. इंजिनची कामगिरी अतिशय दमदार असल्यामुळे तुम्ही निराश होणार नाही. इंजिनमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स बसवण्यात आला आहे. हे 3750rpm वर 7,750rpm पॉवर आणि 19.93Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक कमी किमतीत असल्यामुळे सामान्य ग्राहकांचीही या बाईकला चांगली पसंती आहे.