TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 03:34 PM2022-03-06T15:34:10+5:302022-03-06T15:34:44+5:30

रतन टाटा यांनी या कारमधून केवळ फेरफटकाच मारला नाही, तर हिच्या फिडबॅकही दिला आहे...

Nano EV TATA motors may launch very affordable nano electric in india | TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

Next

नवी दिल्ली - रतन टाटा यांनी जी नॅनो कार घरोघरी नेण्याचे स्वप्न पाहिले आणि कारची किंमत केवळ एक लाख रुपये ठेवली, तीच नॅनो आता इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ElectraEV ने कारसोबत रतन टाटा (Ratan Tata) यांचा फोटो शेअर करत लिहिले, आमच्यासाठी ही एक ‘सुपर प्राउड’ गोष्ट आहे, की आम्ही ही कार रतन टाटा यांना डिलीव्हर केल्यानंतर, त्यांनी केवळ या कारमधून फेरफटकाच मारला नाही, तर हिच्या बद्दल फिडबॅकही दिला. यासंदर्भात Linkedin वर माहिती देताना Tata Motors ने सांगितले की, रतन टाटा यांना ही कार केवळ आवडलीच नाही, तर त्यांनी नॅनोच्या या कारमध्ये बसून फेरफटकाही मारला.

रतन टाटांनी कारबद्दल दिला फिडबॅक -
आता टाटा मोटर्स ही लाखाची कार इलेक्ट्रिक अवतार मार्केटमध्ये आणण्याची तयारी करत आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कंपनीकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाही. नॅनो ईव्ही मार्केटमध्ये आल्यास ही अत्यंत किफायतशीर इलेक्ट्रिक कार ठरेल आणि सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये फिट बसेल.

टाटा नॅनोला पॉवरट्रेन बनवणारी कंपनी इलेक्ट्रा ईव्हीने कस्टमाइज केले आहे. एवढेच नाही, तर रतन टाटा यांना 72 वोल्टची ही नॅनो ईव्ही डिलीव्हर करने आणि तिच्या संदर्भात फिडबॅक घेणे सुपर प्राउड फिलिंग होती, असे म्हणत कंपनीने आनंद व्यक्त केला आहे.

10 सेकंदात 0 ते 60 Kmph चा वेग -
महत्वाचे म्हणजे, नॅनो ईव्ही (Nano EV) ही 10 सेकंदांपेक्षाही कमी वेळेत 0 ते 60 किलो मीटर प्रति तास वेग घेते. ही 4 सीटर कार असून हिच्यामध्ये लीथियम-आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक असूनही ही कार रीयल कारचा फील देते. या कस्टम बिल्ट नॅनो ईव्ही (Tata Nano Electric) मध्ये 72 व्होल्ट आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने हिचे डिझाईन मॉडिफाय करून ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (ARAI) सर्टिफाइड रेंज 213 किलोमीटर अचिव्ह केली आहे.

Web Title: Nano EV TATA motors may launch very affordable nano electric in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.