ना लँड रोव्हर ना जग्वार.., 'या' कारमधून प्रवास करतात रतन टाटा, नाव ऐकून चकीत व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:36 PM2023-12-28T14:36:34+5:302023-12-28T14:39:53+5:30
Ratan Tata: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घ्या.
Ratan Tata: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. देश-विदेशातून लोक टाटांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. टाटा समूहाची धुरा हाती घेतल्यानंतर रतन टाटांनी देशसह जगभरात एक वेगळीच छाप सोडली. आज स्टील, ऑटोमोबाईल, आयटी यासह अनेक क्षेत्रात टाटा ग्रुप विस्तारलेला आहे. या सर्वांचे श्रेय रतन टाटा यांना जाते.
विशेष म्हणजे, लँड रोव्हर आणि जग्वारसारख्या ऑटोमोबाईल ब्रँडची मालकी टाटा समूहाकडे आहे. असे असूनही रतन टाटा एका सामान्य कारमध्येच फिरतात. टाटा कोणती कार वापरतात, हे जाणून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.
टाटा समूहाची कंपनी, टाटा मोटर्सने 2 जून 2008 रोजी अमेरिकेतील प्रसिद्ध कार कंपनी फोर्डच्या मालकीचे लँड रोव्हर आणि जग्वार ब्रँड खरेदी केले होते. टाटा समूहाचा हा करार भारतीय वाहन उद्योगासाठी एक मोठे यश आहे. या खरेदीसोबतच रतन टाटा यांनी फोर्डच्या मालकाने केलेल्या गैरव्यवहाराचा हिशोबही निकाली काढला होता.
रतन टाटा कोणती कार चालवतात?
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण रतन टाटा पूर्वी होंडा कंपनीची सिविक सेडान कार चालवायचे. आता टाटा इलेक्ट्रिक कारचा प्रचार करण्यासाठी टाटा समूहाच्या टाटा नेक्सॉन ईव्ही कारमध्ये फिरतात. विशेष म्हणजे, टाटा मोटर्स भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करते.
रतन टाटांचे कार कलेक्शन
रतन टाटा यांच्याकडे देशातील आणि जगातील सर्वात प्रसिद्ध गाड्या आहेत. त्यांच्या ताफ्यात क्रिसलर सेब्रिंग, रोडस्टर स्पोर्ट्स कार कॅडिलॅक एक्सएलआर, मर्सिडीज बेंझ एस क्लास, मर्सिडीज बेंझ 500 एसएल, लँड रोव्हर आणि टाटा नेक्सन ईव्ही यांचा समावेश आहे.