२५ नव्या बदलांसह आली नवी Bajaj Pulsar 125, मायेलजही वाढलं; किंमत १०० सीसी पेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:29 PM2023-04-12T15:29:43+5:302023-04-12T15:31:07+5:30

बजाजनं आपली २०२३ Pulsar 125 E20 लाँच केली आहे. नवीन इंजिन असलेल्या या मोटरसायकलमध्ये अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत.

New Bajaj Pulsar 125 E20 comes with 25 new changes mileage also increased Price less than 100 cc | २५ नव्या बदलांसह आली नवी Bajaj Pulsar 125, मायेलजही वाढलं; किंमत १०० सीसी पेक्षाही कमी

२५ नव्या बदलांसह आली नवी Bajaj Pulsar 125, मायेलजही वाढलं; किंमत १०० सीसी पेक्षाही कमी

googlenewsNext

बजाजनं आपली 2023 Pulsar 125 E20 लाँच केली आहे. नवीन इंजिन असलेल्या या मोटरसायकलला अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. ही नवी पल्सर पेट्रोलसोबत E20 इंधनावरही चालेल. दरम्यान नवीन कलर्स आणि नव्या अलॉयसह यामध्ये 25 अपडेट्स देण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या सर्व अपडेट्सनंतरही कंपनीनं त्याच्या किंमतीत मोठे बदल केलेले नाहीत. या बदलांसह, ही या विभागातील सर्वात स्वस्त बाईक आहे. त्याच वेळी, त्याची किंमत 110cc सेगमेंटच्या मोटरसायकलपेक्षाही कमी आहे. या बाईकमध्ये नवीन काय असणार आहे ते जाणून घेऊया.

2023 बजाज पल्सर 125 E20 मध्ये कंपनीनं नवीन कलर ऑप्शन्स दिले आहेत. तसेच त्यावर नवीन ग्राफिक्सही पाहायला मिळतील. विशेष बाब म्हणजे ग्रे कलरसह पिवळ्या रंगाचे ग्राफिक्स देण्यात आले आहेत यामुळे बाईकचा लूक आणखीनच चांगला दिसतो. याला मागील बाजूस 125 चं ब्रँडिंग मिळतं. फ्युअल टँकवरील पल्सरचा लोगोही बदलण्यात आला आहे. हे 3D टेक्स्टसह पिवळ्या रंगाच्या थीममध्ये उपलब्ध असेल. पेट्रोल टँकचं झाकणही सिल्व्हर रंगातून काळ्या रंगात बदलण्यात आले आहे.

अलॉय व्हिल्समध्येही बदल
या बाईकमध्ये सर्वात मोठा बदल अलॉय व्हिल्समध्ये करण्यात आलाय. जुन्या मॉडेलच्या तुलनेत हे नवे आहेत. तसंच यात केवळ तीन सपोर्ट देण्यात आलेत. फ्रन्ट व्हिल्समध्ये मिळणारी डिस्क प्लेटही बदलण्यात आलीये.

लक्झरी फील मिळणार
या बाईकमध्ये बजाज 150 चं मीटर मिळेल. याचाच अर्थ ही बाईक अधिक लक्झरी फिल देईल. या मीटरमध्ये IFE, ओडोमीटर, AFE, सर्व्हिसिंग, लो बॅटरीसारखी संपूर्ण माहिती मिळेल. या बाईकचा फ्युअल टँकही बदलण्यात आलाय. यामध्ये पेट्रोल टीच्या ऐवजी फ्युअल पंप देण्यात आलाय. शिवाय यात फ्युअल इंजेक्शन सिस्टम मिळेल. बाईकच्या वायरींगमध्येही बदल करण्यात आलेत.

मायलेज आणि किंमत
यापूर्वीची पल्सर ही जवळपास 50 किमीपर्यंतचं मायलेज देत होती. परंतु आता यात फ्युअल इंजेक्शन सिस्टम लावण्यात आलेय. अशातच ही बाईक 55-60 किमीपर्यंतचे मायलेज देऊ शकते अशी अपेक्षा केली जात आहे. या बाईकची ऑनरोड किंमत 96 ते 97 हजारांच्या जवळ आहे. विशेष म्हणजे हीरो स्प्लेंडरमध्ये 100 सीसी इंजिन देण्यात आले असून त्याची ऑनरोड किंमत 93 हजार रूपये आहे. तर टीव्हीएस रेडरची किंमत 1.03 लाख रुपये आहे. या बाईक्सच्या तुलनेत नव्या पल्सची किंमत अतिशय कमी आहे.

Web Title: New Bajaj Pulsar 125 E20 comes with 25 new changes mileage also increased Price less than 100 cc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.