केंद्र सरकारने काढली नवीन BH Series; दुसऱ्या राज्यातले पोलीस वाहनाला थांबवू शकणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:06 AM2021-08-28T11:06:56+5:302021-08-28T11:08:44+5:30

Central govt introduces BH-series mark for personal vehicles, to ease transfer across states : भारत सरकारच्या रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानुसार जर कोणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेला तर त्या व्यक्तीला त्याचे वाहन 1 वर्षाच्या आत नव्या राज्यात पुन्हा रजिस्टर करावे लागते. हा त्रास वाचणार आहे.

New BH Series launched by Central Government for vehicle; to ease transfer across states | केंद्र सरकारने काढली नवीन BH Series; दुसऱ्या राज्यातले पोलीस वाहनाला थांबवू शकणार नाहीत

केंद्र सरकारने काढली नवीन BH Series; दुसऱ्या राज्यातले पोलीस वाहनाला थांबवू शकणार नाहीत

googlenewsNext

Vehicle registration Transfer: नोकरी, धंद्यानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर ठराविक महिन्यांनंतर तुम्हाला तुमची जुनी कार किंवा बाईक त्या राज्य़ात रजिस्टर करावी लागते. त्यासाठी खर्च आणि परत जुन्या आरटीओची एनओसी वगैरे असे क्लिष्ट प्रकार असतात. यामुळे वाहनचालक तसे न करता जुन्या राज्यातील पासिंगचीच वाहने फिरवतात आणि पोलिसांनी पकडले की एकतर दंड भरतात किंवा वाहन जप्त केले जाते. या कटकटीपासून वाचण्यासाठी मोदी सरकारने नवीन उपाय योजला आहे. (Govt introduces new registration mark under BH-series for new vehicles)

भारत सरकारने वाहनांचा नवीन रजिस्ट्रेशन मार्क सुरु केला आहे. यानुसार भारत सीरीज (bharat series किंवा bh-series) च्या नावाने असलेल्या या रजिस्ट्रेशनद्वारे वाहनांचे रजिस्ट्रेशन ट्रान्सफर सोप्या पद्धतीने केले जाणार आहे. MoRTH ने भारत सीरीजची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता नवीन वाहने बीएच सीरीज (bh-series) मध्ये रजिस्टर करता येणार आहे. ही सुविधा पर्यायी आहे. जर एखाद्या व्यक्ती एका पेक्षा जास्त राज्यांमध्ये नोकरी, कामानिमित्त जास्त काळासाठी जात असेल तर त्याच्यासाठी हे सोयीचे असणार आहे.

काय आहे नियम...
भारत सरकारच्या रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानुसार जर कोणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेला तर त्या व्यक्तीला त्याचे वाहन 1 वर्षाच्या आत नव्या राज्यात पुन्हा रजिस्टर करावे लागते. नवीन सीरीज जुन्या वाहनांना लागू होणार नसली तरी देखील नवीन वाहने घेणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे. 26 ऑगस्टला हे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. Bharat series (BH-series)

कोणाला मिळणार ही सुविधा...
डिफेन्स, केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी, खासगी कंपन्या ज्यांची कार्यालये 4 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहेत. 

कसा असेल नंबर...
जेव्हा वाहन मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट होतो, तेव्हा बीएच सीरीजच्या वाहनांची फेरनोंदणी करण्याची गरज नाही. या रजिस्ट्रेशनचा फॉर्मॅट YY BH 4144 XX असा आहे. YY पहिले रजिस्ट्रेशन वर्ष, BH- भारत सीरीज, कोड 4-0000 ते 9999, XX- मधली अक्षरे AA to ZZ.

Web Title: New BH Series launched by Central Government for vehicle; to ease transfer across states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.