New Car Buying Tips : नवी कार खरेदी करण्याच्या विचारात आहात? त्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 03:13 PM2022-10-05T15:13:37+5:302022-10-05T15:14:53+5:30
New Car Buying Tips : दिवाळी आणि नवरात्रीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात नवीन कार खरेदी करतात. सणासुदीच्या काळात कार कंपन्याही उत्तम ऑफर्स देतात.
New Car Buying Tips : नवीन कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकजण दिवाळीच्या आसपास नवीन कार घेण्याचा बेत आखतात. सर्वसामान्य भारतीयांसाठी हा अत्यंत भावनिक निर्णय असतो. नवीन कार खरेदी करताना भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. अनेकदा डीलर्स ग्राहकांकडून जास्तीतजास्त पैसे काढून घेत असतात. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा प्लॅन बनवला असेल तर आम्ही तुमच्यासाठी 5 खास टिप्स घेऊन आलो आहोत. नवीन कार खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
बजेटआणिमॉडेल
जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार केला असेल तर तुमचे बजेटही निश्चित असेल. भारतीय कार बाजारात तुम्हाला प्रत्येक बजेटची कार सहज मिळेल. तुम्हाला फक्त तुमच्या बजेटनुसार चांगली आणि जबरदस्त कार निवडायची आहे. यामध्ये तुमच्या कुटुंबीयांचे मत घ्यायला विसरू नका. नवीन कार घेण्याचा निर्णय घेताना तुमचे बजेट वाढवू नका.
कशी कार आणि इंधन
काही कार मॉडेल्स आवडल्यानंतर तुम्हाला कशी कार हवी आहे हे पाहावे लागेल. हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही गाड्या सहसा बाजारात विकल्या जातात. आता तुम्ही ठरवा तुमच्या बजेटनुसार या तीनपैकी कोणती कार चांगली असेल. याशिवाय तुम्हाला इंधनाच्या प्रकाराचीही काळजी घ्यावी लागेल. कार खरेदी केल्यानंतर, कारची रनिंग कॉस्ट लक्षात घेऊन, तुमच्यानुसार पेट्रोल, डिझेल, सीएनजी किंवा इलेक्ट्रीक कार यापैकी एक निवडा.
डीलरची माहिती
कारची फायनल केल्यानंतर डीलरची महिती घेणं महत्त्वाचं आहे. ज्याचं प्रोफाईल चांगलं आहे अशाच डीलरची निवड करा. चांगला डीलर तुम्हाला चांगली डील देऊ शकतो. याशिवाय आफ्टर सेल सर्व्हिस सपोर्टमध्येही डीलरचं महत्त्व असतं. त्यामुळे ही निवड विचारपूर्वक करा.
टेस्ट ड्राईव्ह आणि फायनॅन्स
कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आवडत्या कारची टेस्ट ड्राईव्ह नक्कीच घ्या. याच्या मदतीने तुम्हाला कारचे इंजिन, परफॉर्मन्स, फीचर्स, मायलेज, रिसेल व्हॅल्यू, एसी, स्पेस आणि कम्फर्ट, सेफ्टी इत्यादींबद्दल बरीच माहिती मिळेल. यानंतर तुम्ही कार रोखीने खरेदी करणार की फायनान्सची मदत घेणार हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही फायनान्सवर कार खरेदी केल्यास, सर्वोत्तम डील देणारा फायनॅन्सर निवडा. फायनॅन्स प्लॅनमध्ये काही हिडन चार्ज नाही ना याची खात्री करा.
ऑन रोड प्राईज आणि केअर
नवीन कार खरेदी करताना, कोणतीही कागदपत्रे स्वाक्षरी करण्यापूर्वी नीट वाचा. करारावर स्वाक्षरी करताना ऑन-रोड किंमत ब्रेकअप तपासण्याची खात्री करा. यामध्ये एक्स-शोरूम किमती व्यतिरिक्त विमा, जोडलेल्या अॅक्सेसरीज, नोंदणी शुल्क, हायपोथेकेशन चार्जेस, फास्टॅग, अॅडेड वॉरंटी आणि TCS सारख्या गोष्टींचा समावेश असतो. नवीन कार खरेदी केल्यानंतर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी येते. नेहमी वेग-मर्यादा, सीट-बेल्ट आणि वाहतूक नियमांचे पालन करा.