कोमाकीची नवीन E-Scooters, २०० किमीची रेंज, अतिरिक्त बॅटरीसह शानदार फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 02:56 PM2023-10-27T14:56:47+5:302023-10-27T14:59:02+5:30
सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर २०० किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मार्केटमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. नव-नवीन इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये येत आहे. अशा परिस्थितीत एक अशी स्कूटर बाजारात आली आहे, जी तुम्हाला बजेट इलेक्ट्रिक कार इतकी रेंज देईल. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर २०० किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. विशेष म्हणजे, कंपनी स्कूटरसोबत दुसरी बॅटरी देखील देत आहे.
ही स्कूटर कोमाकी एसई ड्युअल (Komaki SE Dual) आहे. कोमाकीने आपली नवीन स्कूटर दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये मार्केटमध्ये आणली आहे. ही स्कूटर ग्राहक चारकोल ग्रे आणि सेकरेमेंटो ग्रीन कलरमध्ये खरेदी करू शकतात. स्कूटरची किंमत देखील अगदी वाजवी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर १.२८ लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.
कंपनीने स्कूटरमध्ये पीओ ४ स्मार्ट बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी अत्यंत सुरक्षित आणि अग्निरोधक आहे. स्कूटर चार्ज करण्यासाठी ४ तास लागतात. ग्राहकांना स्कूटरमध्ये ३ हजार वॅटची हब मोटर देखील मिळेल. याशिवाय, पूर्णपणे वेगळी स्टाइल देण्यासाठी एलईडी डीआरएल लाइट्स देखील देण्यात आले आहेत. तसेच, स्कूटरच्या ड्युअल बॅटरीसह, रायडर्सना २०० किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. कंपनीचे इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा म्हणाले की, एसई ड्युअलसोबत आम्हाला ग्राहकांचा राइडिंग अनुभव आणखी सुधारायचा आहे.
शानदार आहेत फीचर्स
या स्कूटरमध्ये ग्राहकांना एलईडी फ्रंट विंकर, ५० एम्पियर कंट्रोलर, पार्किंग असिस्ट, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट यांसारखी खास फीचर्स मिळतील. नेव्हिगेशन, साउंड सिस्टीम आणि रेडी टू राइड फीचर्ससाठी टीएफटी स्क्रीन देखील आहे. तसेच, स्कूटरमध्ये इको, स्पोर्ट आणि टर्बो असे तीन गियर मोड आहेत आणि यात ड्युअल डिस्क ब्रेक, कीफोब कीलेस एंट्री आणि कंट्रोल आणि अँटी-स्किड टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. स्टोरेजसाठी २० लीटर बूट स्पेस देखील देण्यात आली आहे.